निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं

विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्याचा आणि अनुष्का शर्माचा पुढचा प्लॅन काय आहे याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. विराटने स्वतः एका मुलाखतीत याबद्दल स्पष्टही केलं होतं. पाहुयात तो काय म्हणाला होता ते.

निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं
virat and anushka
Image Credit source: Instagram
| Updated on: May 12, 2025 | 11:31 PM

सर्वांच्या मनावर राज्य करणारा क्रिकेटर, सर्वांचा लाडका खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेट खेळण्यातून आता निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निर्णयाने नक्कीच सर्व चाहत्यांचं मन नाराज झालं आहे. पण चाहत्यांच त्याच्यावरील प्रेम मात्र कायमच असणार आहे. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेवर सर्वांनीच प्रतिक्रिया दिली आहे. त्याची पत्नी तथा अभिनेत्री अनुष्का शर्मानेही तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनुष्काची भावनिक पोस्ट

सोमवारी विराटने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने 14 वर्षांच्या दीर्घ प्रवासानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराटच्या निवृत्तीवर पत्नी अनुष्काचीही प्रतिक्रिया आली आहे. तिने भावनिक पोस्टही शेअर केली. मात्र निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा पुढचा काय प्लान असणार आहे हे जाणून घेण्यासाठी नक्कीच सर्व उत्सुक आहेत. तर याचं उत्तर स्वत: विराटनेच एका मुलाखतीत दिलं आहे.


निवृत्तीनंतर काय असणार प्लान 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) इनोव्हेशन लॅब समिटमध्ये विराट कोहलीने त्याच्या निवृत्तीबद्दल उघडपणे सांगितले. या मुलाखतीत कोहलीला विचारण्यात आलं की निवृत्तीनंतर त्याचा काय प्लान असणार आहे. यावर विराटने उत्तर दिले की त्याला अनुष्कासोबत वेळ घालवायला आवडेल. कोहली पुढे म्हणाला की, “निवृत्तीनंतर मी काय करेन हे मला खरोखर माहित नाही. मी अलिकडेच माझ्या एका सहकाऱ्याला हाच प्रश्न विचारला आणि मलाही तेच उत्तर मिळाले. हो पण मी कदाचित खूप प्रवास करेन. खूप फिरेन” याचा अर्थ विराट आणि अनुष्का आधीच लंडनला शिफ्ट झाले आहेत.


अनुष्काप्रमाणे विराटही आता या गोष्टीत रमणार…

अनुष्काने तिच्या मुलांसाठी कामातून ब्रेक घेतला आहे. आणि ते कायमचे लंडनला शिफ्ट झाले आहेत. त्यामुळे नक्कीच विराटही आता अनुष्काप्रमाणे त्याच्या मुलांसोबत जास्त वेळ घालवेल आणि जसं तो म्हणाला तसं कुटुंबासोबत जगभर प्रवासही करेल. आता निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काच्या पुढील प्लानची चाहत्यांनी खरोखरच उत्सुकता आहे.

 एकदिवसीय स्वरूपात खेळताना दिसणार विराट 

विराट कोहलीने टी-20 आणि कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. आता तो फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळताना दिसेल. अशा परिस्थितीत, विराट कोहलीला आता त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या भरपूर संधी मिळतील.