AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंह राजपूत बद्दल असं का म्हणाली होती सारा? ‘मला चुकून कळलं होतं मुलगा खूपच…’

Sara Ali Khan: 'मला चुकून कळलं होतं मुलगा खुपच...', सुशांत सोबत 'ती' पहिली भेट, अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणात साराची चौकशी... कशी झाली नात्याची सुरुवात? चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात सारा - सुशांत यांच्या नात्याच्या चर्चा...

सुशांत सिंह राजपूत बद्दल असं का म्हणाली होती सारा? 'मला चुकून कळलं होतं मुलगा खूपच...'
| Updated on: Aug 14, 2024 | 2:08 PM
Share

अभिनेत्री सारा अली खान आज तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली होती. सुशांत याच्या निधनानंतर एमसीबीकडून साराची चौकशी देखील करण्यात आली. तेव्हा सुशांत याच्यासोबत असलेलं नातं अभिनेत्रीने मान्य केलं होतं. ‘सुशांत नात्यांमध्ये निष्ठावंत नसल्यामुळे आमचं ब्रेकअप झालं…’ असं देखील सारा म्हणाली होती.

अशात सारा आणि सुशांत यांची पहिली भेट कशी झाली? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. तर सारा – सुशांत यांची पहिली भेट दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी झाली होती. तेव्हा सारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं नव्हतं… एका मुलाखतीत सारा हिने सुशांत सोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं होतं.

सांगायचं झालं, अभिनेता सुशांत सिंह राजपूत स्टारर ‘राब्ता’ सिनेमातील ‘मैं तेरा बॉयफ्रेंड… ना ना ना ना’ गाणं सारा हिला प्रचंड आवडलं होतं. ‘गाण्यात सुशांतचा डान्स पाहून मी पूर्णपणे वेडी झाली होती. मला ते गाणं फार आवडलं होतं. मला सुशांतला भेटायचं होतं. करणच्या घरी आमची पहिली भेट झाली.’

‘पहिली भेट झाल्यानंतर मी सुशांतला सांगितलं मला तुचे एब्स आणि कृतीचे पाय प्रचंड आवडले… मला आठवत आहे की मी सुशांत – क्रिती यांना सांगितलं होतं… गाणं प्रचंड जबरदस्त आहे… पण ज्याप्रकारे सुशांत माझ्यासोबत बोलत होता त्यामुळे मला कळलं होतं की, हा प्रचंड हुशार आहे…’

‘मला कळून चुकलं होतं की सावधान राहायला हवं कारण मुलगा प्रचंड स्मार्ट आहे… खूप हुशार आहे… ‘ असं देखील सारा म्हणाली होती. त्यानंतर अभिनेता सुशांत याच्यासोबत सारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘केदारनाथ’ सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती.

‘केदारनाथ’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान सारा आणि सुशांत यांच्या नात्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. शिवाय अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं. सुशांत याच्या मृत्यूनंतर सारा महत्त्वाच्या दिवशी अभिनेत्यासोबत असलेल्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...