सलमान खान वडिलांसमोर म्हणाला, ‘माझ्याकडे आई आहे, ती सुद्धा…’, व्हिडीओ तुफान व्हायरल
Salman Khan: 'माझ्याकडे आई आहे, ती सुद्घा...', वडिलांसमोर आईबद्दल असं काय म्हणाला सलमान खान? व्हिडीओ तुफान व्हायरल, व्हिडीओवर चाहत्यांकडून होत आहे लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव... सर्वत्र व्हायरल व्हिडीओची चर्चा...

अभिनेता सलमान खान याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमान याच्यासोबत बॉलिवूडचे दिग्गज कलाकार सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर देखील दिसत आहेत. बॉलिवूडच्या तीन कलाकारांना एकत्र पाहिल्यानंतर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, ते एकत्र का आले असावेत? कारण आहे एका सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चचं… जावेद अख्तर आणि सलीम खान या जोडीच्या पहिल्या ‘अँग्री यंग मेन’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘अँग्री यंग मेन’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये सलमान खान याचा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला. सलमान खान वडीलच्या खुर्ची मागेच उभा होता. शिवाय यावेळी भाईजानने केलेलं वक्तव्य देखील तुफान चर्चेत आहे.
सलीम खान आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या ‘अँग्री यंग मेन’ या पहिल्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी सलमान मजेदार मूडमध्ये दिसला. सलमानने या सुपरहिट जोडीच्या सिनेमातील डायलॉग देखील आपल्या खास शैलीत बोलून दाखवले. व्हिडीओमध्ये फरहान अख्तर आयकॉनिक डायलॉगवर बोलताना दिसत आहे.
View this post on Instagram
फरहाना स्वतःचा आवडता डायलॉग म्हणतो, डायलॉग ‘डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है’. यावर सलमान म्हणतो, मला नाही विचारणार… माझा आवडता डायलॉग… ‘मेरे पास मां है, वो भी दो-दो…’ सलमान खान याचं वक्तव्य ऐकून चाहते देखील आनंदी झाली. व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण भाईजानचं कौतुक करत आहेत.
सलमान खान याच्या व्हायरल व्हिडीओ चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणला, ‘जो पर्यंत वडील बसले आहेत तोपर्यंत सलमान उभाच राहिल…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान वडिलांचा आदर करतो म्हणून त्यांच्या समोर कधीच बसत नाही…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खान प्रत्येक वेळी मन जिंकून घेतो…’ सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा रंगली आहे.
