करीनाला मांडीवर बसून भरवलं आणि आज ती…, अक्षय कुमार याचं मोठं वक्तव्य, चाहते हैराण
Kareena Kapoor - Akshay Kumar: अनेक वर्षांनंतर करीना कपूर - अक्षय कुमार यांच्या नात्याचं सत्य आलं समोर, अभिनेता म्हणाला, 'करीनाला मांडीवर बसून भरवलं आणि आज ती...', सध्या सर्वत्र करीना - अक्षय यांच्या नात्याची चर्चा

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. दोघांच्या चाहत्यांची संख्या आज फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रपार देखील अक्षय आणि करीना यांचा बोलबाला आहे. पण अक्षय आणि करीना यांच्या नात्याबद्दल फार कमा लोकांना माहिती आहे. एका मुलाखतीत खुद्द अक्षय यांने करीना हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
सांगायचं झालं तर, अक्षय कुमार आणि करीना कपूर यांची जोडी बॉलिवूडच्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. दोघांनी एकत्र अनेक सिनेमांसाठी स्क्रिन शेअर केली आहे. दोघांच्या वयामध्ये देखील मोठं अंतर आहे. असं असताना देखील दोघांच्या मोठ्या पडद्यावरील रोमान्स चाहत्यांना आवडतो… यावर अक्षय कुमारने मोठं वक्तव्य देखील केलं होतं.
View this post on Instagram
मुलाखतीत अक्षय म्हणाला होता, ‘जेव्हा मी करियरला सुरुवात केली, तेव्हा करीना फार लहान होती. मी माझ्या मांडीवर घेऊन तिवा भरवायचो… तिला खेळवायचो… पण आज ती प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. आमच्या दोघांमध्ये खासगी आणि प्रोफेशनल नातं आहे…’ असं देखील अभिनेता म्हणाला होता.
एवढंच नाही तर, करीना हिने देखील अक्षयच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘अक्षय याच्यासोबत फार घट्ट नातं आहे. माझ्यासाठी अक्षयचं भेटणं म्हणजे घर भेटण्यासारखं आहे. तो माझ्यासाठी एका कुटुंबाप्रमाणे आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.
View this post on Instagram
अक्षय आणि करीना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. करीना, अक्षय याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. अक्षय याने करीनाची मोठी बहीण करिश्मा हिच्यासोबत देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तेव्हा सिनेमाचं शुटिंग सुरु असताना करीना करिश्मासोबत सेटवर जायची… याच दरम्यान अक्षय याच्यासोबत करीनाची ओळख झाली.
करीना आणि अक्षय यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘गब्बर’, ‘गुडन्यूज’, ‘कमबख्त इश्क’, ‘बेवफा’, ‘टशन’, ‘अजनबी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला प्रेम दिलं.
