सर्वात बोल्ड अभिनेत्री, सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्री फेल, पण अचानक इंडस्ट्रीतून झाली गायब

बॉलिवूडची सर्वात बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री, भूतनी बनून रातोरात झाली प्रसिद्ध. विनोद खन्नांसोबत केलं होतं पदार्पण. मात्र, अचानक इंडस्ट्रीतून झाली गायब. कोण आहे ती?

सर्वात बोल्ड अभिनेत्री, सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्री फेल, पण अचानक इंडस्ट्रीतून झाली गायब
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 13, 2026 | 2:59 PM

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे जस्मिन धुन्ना. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीराना’ या हॉरर चित्रपटातील भूतनीच्या भूमिकेमुळे जस्मिन धुन्ना रातोरात लोकप्रिय झाली. मात्र, प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही तिने अचानक चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आजही तिच्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.

जस्मिन धुन्ना हिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1979 मध्ये ‘सरकारी मेहमान’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात ती अभिनेता विनोद खन्ना यांच्यासोबत दिसली होती. त्यावेळी जस्मिन धुन्नाचं वय अवघं 13 वर्षं असल्याचं सांगितलं जातं. मात्र, या चित्रपटातून तिला विशेष लोकप्रियता मिळाली नाही.

Loading...

‘वीराना’मधील भूमिकेमुळे मिळाली ओळख

1988 मध्ये रामसे ब्रदर्स यांचा ‘वीराना’ हा हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला आणि जस्मिन धुन्नाच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. या चित्रपटात तिने एका दुष्ट आत्म्याच्या प्रभावाखाली असलेल्या महिलेची भूमिका साकारली होती. तिचा लूक, चेहऱ्यावरील हावभाव आणि पडद्यावरील प्रभावी उपस्थिती यामुळे प्रेक्षकांमध्ये तिची चर्चा रंगली. ‘वीराना’ लोकप्रिय झाल्यानंतर जस्मिन धुन्नाला हॉरर चित्रपटांमधील एक लक्षवेधी चेहरा म्हणून ओळख मिळाली.

‘वीराना’च्या यशानंतर जस्मिन धुन्नाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. मात्र, चित्रपटाचे निर्माते दीपक रामसे यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, जैस्मिनने पुढे चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला. तिने तुलसी रामसे आणि श्याम रामसे यांनाही आपण आता चित्रपटांत काम करू इच्छित नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच आपला फोन नंबर इतर निर्मात्यांना देऊ नये, अशी विनंतीही तिने केली होती. तिच्या निर्णयाचा आदर करत निर्मात्यांनी तिच्यावर दबाव आणला नाही.

चार दशकांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर

जैस्मिन धुन्नाचं नाव काही काळ अंडरवर्ल्डशी संबंधित चर्चांमध्येही जोडलं गेलं होतं. मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कालांतराने ती पूर्णपणे प्रसिद्धीपासून दूर झाली. गेल्या अनेक दशकांपासून ती कुठे आहे आणि सध्या काय करते, याबाबत ठोस सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही.

‘वीराना’मधील भूमिकेमुळे आजही जैस्मिन धुन्नाची आठवण काढली जाते. एका चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली; मात्र त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us