AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना यांच्या पोस्टनंतर हृतिकची गर्लफ्रेंड चर्चेत; कोट्यवधींमध्ये कमावते सबा आझाद

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांच्या पोस्टनंतर अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सबा आझादची दरवर्षी कोट्यवधींची कमाई करते. तिच्याबद्दल सविस्तर जाणून घ्या..

कंगना यांच्या पोस्टनंतर हृतिकची गर्लफ्रेंड चर्चेत; कोट्यवधींमध्ये कमावते सबा आझाद
कंगना राणौत, हृतिक रोशन-सबा आझादImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 03, 2026 | 10:48 AM
Share

सध्या सोशल मीडियावर ‘सॉरी हृतिक’चा हॅशटॅग तुफान व्हायरल होत आहे. या ट्रेंडवर अभिनेता हृतिक रोशनने प्रतिक्रिया दिल्यानंतर आता अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. हृतिकला उत्तर देताना कंगना यांनी त्याची गर्लफ्रेंड सबा आझादचंही नाव घेतलं. सोशल मीडियावरील हा ट्रेंड 2016 मधील हृतिक आणि कंगना यांच्यातील कायदेशीर लढाईशी संबंधित आहे. कंगना यांनी आता थेट सबा आझादचं नाव घेऊन हृतिकला सुनावलं की, तुझ्या जोडीदाराला लाजिरवाणं वाटू देऊ नको.

नीट पेपरफुटीप्रकरणी तरुणांनी केलेल्या आंदोलनवार टीका करत कंगना यांनी जेन-झींना थेट ‘गटरछाप’ म्हटलं होतं. यानंतर नेटकऱ्यांनी कंगना यांचे जुने क्लिप्स आणि वाद उकरून काढले. यासोबतच ‘सॉरी हृतिक रोशन’चा ट्रेंड चर्चेत आला. या ट्रेंडवर जेव्हा हृतिकने टिप्पणी केली, तेव्हा कंगना यांनी त्याच्यावरच पलटवार केला. कंगना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, ‘प्रिय हृतिक, मला आनंद आहे की तुला तुझा परफेक्ट जोडीदार भेटला आहे. तू आणि सबा आझाद सोबत खूप छान दिसता. तुम्ही एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहात आणि कोणत्याही महिलेला अशाप्रकारे चिडवणं तुला शोभत नाही. उलट जे लोक तुझं नाव वापरून माझा छळ करत आहेत आणि धमकावत आहेत, त्यांचा तू निषेध केला पाहिजे. आगीत तेल ओतणं आणि तुझ्या जोडीदाराला लाज वाटेल असं वागणं थांबव.’

सबा आझादची पोस्ट-

कोण आहे सबा आझाद?

कंगना यांच्या या पोस्टनंतर हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सबा आझादचा जन्म दिल्लीत 1 नोव्हेंबर 1990 मध्ये झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. तिने दिल्लीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर थिएटरमध्ये सहभाग घेतला. 2008 मध्ये तिने ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. सबाने अनेक शॉर्ट फिल्म्समध्येही काम केलं आहे. सोनी लिववरील ‘रॉकेट बॉइज’ या चित्रपटातही ती झळकली होती.

सबा आझादला अभिनयासोबतच गायनाचीही विशेष आवड आहे. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाहसोबत ती ‘मॅडबॉय/मिंक’ नावाचा बँड चालवते. 2010 मध्ये तिने स्वत:ची थिएटर कंपनी सुरू केली होती. दरवर्षी ती जवळपास 5 ते 8 कोटी रुपयांची कमाई करते. म्युझिक बँड, थिएटर आणि चित्रपटांमधून तिची ही कमाई होते.

Follow Us
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?