असं आयुष्य नकोच… अभिनेत्रीच्या आयुष्यात वादळ नव्हे, त्सुनामी; नवऱ्यानेच केले तीन लग्न आणि…

अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरूवात ही बाॅलिवूड चित्रपटांपासून केली. विशेष म्हणजे अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका केल्या. फक्त चित्रपटच नाही तर हिने हिट मालिकांमध्येही तिने धमाकेदार कामगिरी केली. मात्र, खासगी आयुष्यामध्ये अनेक मोठे वादळे या अभिनेत्रीच्या जीवनामध्ये बघायला मिळाली.

असं आयुष्य नकोच... अभिनेत्रीच्या आयुष्यात वादळ नव्हे, त्सुनामी; नवऱ्यानेच केले तीन लग्न आणि...
| Updated on: Jan 08, 2024 | 4:09 PM

मुंबई : अनेक हिट चित्रपट आणि असंख्य मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका करणारी अभिनेत्री. विशेष म्हणजे ही अभिनेत्री आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. या अभिनेत्रीचे करिअर सुपरहिट ठरले. मात्र, खासगी आयुष्यामध्ये अनेक घडामोडी या अभिनेत्रीच्या घडत आहेत. खासगी आयुष्यामध्ये फक्त वादळच नाही तर त्सुनामी आला. या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरूवात वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी केली. विशेष म्हणजे एका मागून एक हिट चित्रपट केले आणि करिअरमध्ये कधीच मागे वळून बघितलेच नाही.

या अभिनेत्रीने ‘अकेले हम अकेले तुम’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली. विशेष म्हणजे थेट आमिर खान याच्यासोबत पहिलाच चित्रपट करण्याची संधी अभिनेत्रीला मिळाली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून जेनिफर विंगेट आहे. जेनिफर विंगेट हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या.

विशेष म्हणजे फक्त चित्रपटच नाही तर टीव्ही मालिकांमध्ये तिने मोठा काळ गाजवला आहे. जेनिफर विंगेट ही वेब स्टोरीमध्ये देखील धमाल करताना दिसली. टीव्ही मालिकांमधील सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री ही जेनिफर विंगेट हीच आहे. मात्र, करिअर जरी हिट असेल तरी खासजी आयुष्यामध्ये जेनिफर विंगेट हिच्या अनेक चढउतार हे बघायला मिळाले.

जेनिफर विंगेट हिने अभिनेता करण सिंह ग्रोवर याच्यासोबत 9 एप्रिल 2012 रोजी लग्न केले. मात्र, यांचे लग्न फार जास्त काळ टिकू शकले नाही. 2014 मध्ये जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोहर यांचे लग्न तुटले. यानंतर करण सिंह ग्रोहर याने श्रद्धा निगम हिच्यासोबत लग्न केले. त्याचे हे लग्न फक्त आणि फक्त 10 महिनेच टिकले.

दुसऱ्या लग्नानंतर करण सिंह ग्रोहर याने थेट बाॅलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू हिच्यासोबत लग्न केले. जेनिफर विंगेटला सोडल्यानंतर करण जोहर याने तब्बल दोन लग्न केली. जेनिफर विंगेट ही कायमच चर्चेत असते. जेनिफर विंगेट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही नक्कीच बघायला मिळते. सोशल मीडियावर जेनिफर विंगेट चांगलीच सक्रिय असते.

17.2 मिलियन लोक हे जेनिफर विंगेट हिला फाॅलो करतात. टीव्ही क्षेत्रातील सर्वात जास्त कमवणारी अभिनेत्री म्हणजे जेनिफर विंगेट हीच आहे. जेनिफर विंगेट ही एका एपिसोडसाठी तब्बल 1.5 लाख रूपये फिस ही आकारते. विशेष बाब म्हणजे जेनिफर विंगेट हिची एकून संपत्ती ही तब्बल 42 कोटी आहे. सोशल मीडियावर देखील जेनिफर विंगेट ही सक्रिय असते.