
Sunjay Kapur’s Sona Comstar: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती संजय कपूर याचं 12 जून रोजी निधन झालं आहे. 19 जून रोजी संजय कपूर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आली. संजय कपूर कोट्यवधींचा उद्योग आणि संपत्ती कुटुंबियांसाठी माागे ठेवून गेला आहे. संजय कपूर याच्या निधनानंतर, त्याची कंपनी सोना बीएलडब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड (सोना कॉमस्टार) ने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, जेफ्री मार्क ओव्हरली आता कंपनीचे नवे अध्यक्ष असतील. जेफ्री मार्क ओव्हरली यांनी काल म्हणजेच 23 जून 2025 रोजी आपला पदभार स्वीकारला.
जेफ्री मार्क ओव्हरली हे कंपनीशी बऱ्याच काळापासून जोडलेले आहेत. ते 12 फेब्रुवारी 2021 पासून कंपनीचे स्वतंत्र संचालक होते. गेल्या पाच वर्षांत, त्यांनी सर्व बोर्ड आणि कमिटी बैठकांना हजेरी लावली आहे. त्यांनी वेगवेगळ्या टाइम झोनमधून कंपनीसाठी निर्णय घेण्यास मदत केली आहे. ज्याचा कंपनीला मोठा फायदा झाला आहे.
ओव्हरली सध्या इतर अनेक कंपन्यांचे स्वतंत्र संचालक आहे. यामध्ये परफॉर्मन्स फूड ग्रुप, फोर्ट्रेक्स इंक. लिमिटेड (पूर्वी पॅकर सॅनिटेशन सर्व्हिसेस इंक.), यांचा समावेश आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजय कपूर यांच्यान निधनाची आणि त्यांच्या उद्योगाची चर्चा सुरु आहे.
संजय कपूर याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, संजय कपूरची संपत्ती करिश्मा कपूरपेक्षा जवळपास 100 पटीने जास्त होती. तो सोना ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक होता, जो ऑटोमोटिव्ह घटकांच्या निर्मिती आणि पुरवठ्यात मोठे नाव आहे. या ग्रुपचा व्यवसाय देश-विदेशात पसरला आहे. याशिवाय त्याने रिअल इस्टेट आणि फॅशन इंडस्ट्रीतही गुंतवणूक केली होती.
संजय कपूरने संपूर्ण संपत्ती प्रियाच्या नावे केली. ही संपत्ती कोट्यवधींची आहे, ज्यामध्ये लक्झरी कार, रिअल इस्टेट, शेअर्स आणि कौटुंबिक व्यवसायातील हिस्सा यांचा समावेश आहे. संजय कपूरच्या नेतृत्वाखाली सोना ग्रुपने जी वाढ झाली. त्याच्या जाण्याने केवळ त्याच्या कुटुंबालाच नव्हे, तर उद्योगालाही मोठा धक्का बसला आहे.