
Bollywood Actress with Underworld Don: अभिनेत्रीचं आयुष्य फार चांगलं आहे असं अनेकांना वाटतं. पण झगमगत्या विश्वातील काळ सत्य जेव्हा समोर येतं तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. ज्यामुळे अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडचा निरोप घेतला आणि संसारकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केलं. पण काही अभिनेत्रींचं आयुष्या कारण नसताना उद्ध्वस्त झालं. त्यामागे कारण देखील तसं आहे. अभिनेत्रींची अंडरवर्ल्ड डॉनसोबत असलेले प्रेमसंबंध. एककाळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डची दहशत होती. अनेक अभिनेत्रींचं करीयर अंडरवर्ल्ड डॉनमुळे नष्ट झालं. असंच काही प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका बेदी हिच्यासोबत देखील झालं आहे.
मोनिका बेदी हिला तुरुंगवास देखील भोगावा लागला… अभिनेत्रीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं कारण मोनिका डॉन अबू सलेम याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मोनिका, अबू सलेम याच्यासोबत राहते असं कळल्यानंतर अनेकांनी तिला ‘गोल्ड डिगर’ देखील म्हटलं…
एका मुलाखतीत अभिनेत्री धक्कादायक वास्तव सांगितलं. अबू सलेम याच्यासोबत असताना धुणीभांडी आणि स्वयंपाक केल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं. मुलाखतीत मोनिका म्हणाली, ‘अबू सलेम याच्यावर जीवापाड प्रेम करायची त्यामुळे त्याच्या कृत्यांबद्दल मला काहीही माहिती नव्हतं. जेव्हा अबू सलेम याला पोर्तुगाल येथून अटक केली. तेव्हा मला मोठा धक्का बसला. जेव्हा मी त्याच्या विरोधात दाखल झालेली चार्जशीट वाचली मला मोठा धक्का बसला. दंड, गंभीर अपराध, लोकांचे मृत्यू… मी पूर्णपणे कोलमडून गेली.’
‘अबू सलेम पळत आहे… हे मला माहिती होतं. पण चार्जशीट पाहिल्यानंतर माझे डोळे उघडले. अबूकडे पैसा होता म्हणून मी त्याच्यासोबत आहे. असं अनेकांना वाटलं, मी एका राजकुमारीसारखं आयुष्य जगत आहे, असं अनेकांना वाटलं. पण मी प्रचंड वाईट दिवस पाहिले आहेत. मी त्याच्यासाठी साफ-सफाई केली आहे. मी त्याच्यासाठी धुणीभांडी केली आहेत. स्वयंपाक देखील बनवलं आहे.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर मी चांगलं आयुष्य जगली असेल तर फक्त माझ्या आई – वडिलांच्या घरी. त्यानंतर जेव्हा मी स्वतः पैसे कमवायला लागली. पैशांसाठी डॉनसोबत आहे असं सर्वांना वाटायचं. पण कसले आणि कोणते पैसे? काही कारण नसताना मला भोगावं लागलं. मला अडकवण्यात आलं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. अबू सलेम याच्यामुळे मोनिका तब्बल 1 वर्ष तुरुंगात होती. आता अभिनेत्री आनंदी आयुष्य जगत आहे.