त्याला कोंबडीची नव्हे तर..; इस्कॉनच्या शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये व्यक्तीला चिकन खाताना पाहून भडकला प्रसिद्ध गायक
अनेकांचं श्रद्धास्थान इस्कॉनच्या शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये व्यक्तीला चिकन खाताना पाहून भडकला प्रसिद्ध गायक, व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ....

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इस्कॉनच्या शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीला चिकन खाताना पाहिल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर, बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट संबंधित व्यक्तीला चांगलंच सुनावलं आहे. लंडनमधील इस्कॉनच्या राधा-कृष्ण मंदिरातील गोविंदा या शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये चिकन खाणाऱ्या माणसावर रॅपर बादशाहने टीका केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका व्हिडिओवर बादशाहने प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओमध्ये, त्या माणसाने रेस्टॉरंटमध्ये चिकन खाल्ले असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये, एक माणूस रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांकडे जाताना दिसतो आणि विचारतो, “हे शाकाहारी रेस्टॉरंट आहे का? तर, इथे मांस मिळत नाही? तुम्ही खरं बोलत आहात का?’ जेव्हा कर्मचारी त्याला वारंवार सांगतात की ते शाकाहारी रेस्टॉरंट आहे, तेव्हा तो माणूस बॉक्समधून चिकन काढतो आणि खायला सुरुवात करतो.
रॅपर बादशाहची प्रतिक्रिया
व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना रॅपर बादशाहने लिहिलं की, “कोंबडीलाही लाज वाटेल. त्याला कोंबडीची नाही तर चप्पलची भूक होती. तुम्हाला जे समजत नाही त्याचा आदर करण्यातच खरी ताकद आहे.” असं सोशल मीडियाच्या माध्यमातून बादशाह म्हणाला आहे.

फक्त बादशाह नाही तर, अनेकांनी त्या व्यक्तीवर टीका केली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हे खूप वाईट आहे. ही व्यक्ती भूक भागवण्याच्या उद्देशाने शाकाहारी ठिकाणी आली नव्हती तर द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने आली होती. आशा आहे की त्याच्यावर कारवाई होईल.’
अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘यावरून कळतं की लोकं कशा प्रकारे स्वतःचा मार्ग चुकू शकतात. कोणाबद्दलही किंवा कशाबद्दलही आदर नाही. मला त्यांच्या मनःस्थितीबद्दल वाईट वाटतं. अशा लोकांसाठी फक्त नरकात जागा आहे..!”
बादशाह याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘मर्सी’, ‘अक्कड बक्कड’, ‘गर्मी’ आणि ‘सनक’ यांसारख्या गाण्यांमुळे प्रसिद्ध आहे. बादशाह सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.
