AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातांनो… तुम्हीही ही चूक करत नाही ना? बाळ हेल्दी व्हावं म्हणून दिला बदाम, तोच ठरला असता काळ ! चिमुकल्यासोबत जे घडलं..

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एका वर्षाच्या चिमुकल्याला जीवदान मिळाले आहे. आईचे लक्ष नसताना मुलाने चुकून बदाम गिळला, ज्यामुळे सात दिवस त्याला खोकला आणि दम लागला. खासगी रुग्णालयांत निदान न झाल्याने घाटीत दाखल केले. डॉ. सुनील देशमुख यांनी दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून अडकलेला बदाम काढला. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे चिमुकल्याचे प्राण वाचले, लहान मुलांना अशा वस्तू देण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला.

मातांनो... तुम्हीही ही चूक करत नाही ना? बाळ हेल्दी व्हावं म्हणून दिला बदाम, तोच ठरला असता काळ ! चिमुकल्यासोबत जे घडलं..
चिमुकल्याने गिळला होता बदामImage Credit source: Getty Images
| Updated on: Feb 06, 2026 | 1:59 PM
Share

तब्येत चांगली रहावी, हेल्दी व्हावं म्हणून लहानापांसून मोठ्या पर्यंत अनेक जण बदाम, मनुका, काजू, अंजीर असा सुका मेवा खात असतात. आपल्याकडे बहुतांश पालक हे लहान मुलांनाही ड्रायफ्रुट्स खायला देतात, पण हीच सवय जीवावर बेतू शकते. छत्रपती संभाजीनगर मध्ये असाच काहीस प्रकार घडला, ज्याने सर्वांचं धाबं दणाणलं. बदाम खाणं अवघ्या वर्षभराच्या मुलाच्या जीवावर बतू शकलं असतं. मात्र सुदैवाने डॉक्टरांनी वेळीच निदान केल्याने योग्य वेळी शस्त्रक्रिया झाली आणि त्या मुलाच्या फुफ्फुसातून बदाम काढण्यात आला. आणि त्याच्या तब्येतीचा धोका टळला. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेवर केलेल्या उपचारांमुळे चिमुकल्याला जीवनदान मिळाले. सगळीकडे सध्या याचबदद्ल चर्चा सुरू आहे.

नेमकं काय घडलं ?

लहान मुलं सदृढ व्हावीत म्हणून अनेक पालक हे मुलांना खारीक खोबरे, काजू, बदाम इत्यादी पदार्थ किसून देतात. मात्र अशा पदार्थांमुळे कधी कधी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, याचा प्रत्यय एका घटनेतून आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथे राहणाऱ्या एका वर्षांच्या मुलाबाबत असंच काहीसं घडलं. आईचे लक्ष नसताना त्या अवघ्या 1 वर्षाच्या चिमुकल्याने चुकून बदाम गिळला. त्यानंतर त्यानंतर तब्बल सात दिवसांपासून त्या मुलाला सतत खोकला, ताप येत होता. तसंच त्याला खूप दमही लागत होता,. असा बराच त्रास तो सात दिवस सहन करत होता.

ते पाहून आई-वडिलांना काळजी वाटली. मुलाला तपासण्यासाठी आई-वडिलांनी त्याला विविध खासगी रुग्णालयांमध्ये नेलं, तिथे चेक केलं. पण नेमकं काय झालंय याचं ठोस निदान तिथे होऊ शकलं नाही. मुलाची तब्येत काही सुधारत नव्हतीच. अखेर मुलाला घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात दाखवलं आणि तिथे दाखल करण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी त्या मुलाला कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे तपासणीसाठी पाठवलं.

तपासणीनंतर डॉ. देशमुख यांनी मुलाच्या फुफ्फुसात काहीतरी अडकले असण्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर सीटी स्कॅन तपासणी करण्यात आल्यावर निदान निश्चित झालं. फुफ्फुसात बदामाचा तुकडा अडकला होता. त्यानंतर पहाटे दीड ते दोन वाजेदरम्यान तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या मुलाच्या डाव्या फुफ्फुसात अडकलेला बदामाचा तुकडा दुर्बिणीच्या सहाय्याने चिमट्याने काढून यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला. ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वी ठरली, पण घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेवर केलेल्या उपचारांमुळे चिमुकल्याला जीवनदान मिळालं.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा