AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...

भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या…

| Updated on: Aug 10, 2026 | 10:58 AM
Share

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर देशभरात चर्चा सुरू आहे. या मिश्रणामुळे परदेशातून इंधनासाठी होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल, तसेच इथेनॉल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

इथेनॉल मिश्रणावरून भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर देशभरात चर्चा सुरू आहे. या मिश्रणामुळे परदेशातून इंधनासाठी होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल, तसेच इथेनॉल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या धोरणावर काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत.

मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी रीवा विमानतळावरील कार्यक्रमात या विषयावर भाष्य केले. कोलकाता-रीवा-भोपाळ हवाई सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी इथेनॉल मिश्रणाचे समर्थन केले. या धोरणामुळे देशाची इंधनावरील परदेशी अवलंबित्व कमी होऊ शकते, असा सरकारचा दावा आहे. त्यामुळे शेतकरी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्राझीलमध्ये इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारतीय वाहने पूर्णपणे इथेनॉलवर चालण्यास सक्षम असल्याचा दावाही केला.

दरम्यान, शुद्ध पेट्रोलची मागणी करणाऱ्यांवर टीका करताना जनार्दन मिश्रा यांची जीभ घसरली. त्यांनी व्यासपीठावरून म्हटले की, “शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येते का?” त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यक्रमावेळी मध्य प्रदेशातील अनेक नेते उपस्थित होते.

Published on: Aug 10, 2026 10:55 AM

Follow Us