AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर शरद पवारांचे खासदार आणि PM मोदींची बैठक संपली; 15 मिनिटांत नेमकी काय चर्चा झाली?

शरद पवारांच्या 8 खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली. या भेटीनंतर झालेल्या बैठकीत खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडले.

अखेर शरद पवारांचे खासदार आणि PM मोदींची बैठक संपली; 15 मिनिटांत नेमकी काय चर्चा झाली?
| Updated on: Aug 10, 2026 | 1:08 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात दोन भेटी झाल्या होत्या. दुसरीकडे आज सोमवारी शरद पवारांचे 8 खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. राष्ट्रवादीचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 15 मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती समोर आली आहे.

नेमकी काय चर्चा झाली?

शरद पवारांच्या 8 खासदारांनी संसद भवानातील पंतप्रधान कार्यालयात पीएम नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेटीनंतर झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सर्व खासदार भेटीसाठी पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यानंतर शरद पवार यांच्या एनर्जीचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे, अशा शब्दात मोदींनी कौतुक केलं.त्यानंतर सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मतदारसंघातील प्रश्न मांडले.

खासदारांनी कोणते प्रश्न मांडले?

खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या पाण्याचा प्रश्न मांडला. उजनी धरणातून बीड जिल्ह्याला पाणी सोडा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. पीएम केअरमधून खासदारांना 35 रुग्णांसाठी मदत देता येते, त्यांची संख्या वाढवावी. केवळ एका खासदारांसाठी नव्हे, तर सर्व खासदारांसाठी ही वाढ करावी, असा मुद्दा सोनवणे यांनी मांडला.

नवी मुंबईच्या विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी दिल्लीत आंदोलन देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली. नावाविषयी राज्य सरकारने प्रस्ताव मान्य केला आहे. आता प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार म्हात्रे यांनी केली. नगरचे खासदार निलेश लंके यांनी कर्करोगाविषयीचा मुद्दा हा पंतप्रधान मोदींकडे मांडला. खासदार अमोल कोल्हे यांनी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मुद्दा मांडला. खासदार अमर काळे यांनीही पंतप्रधान मोदींकडे त्यांच्या मतदारसंघाचा मुद्दा मांडला आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच