AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्ष कसा फुटतो, हे अमित शहांना कळणार, आता दयामया नाही; संजय राऊतांचं ओपन चँलेज

संजय राऊत यांनी पुन्हा सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. सत्ता आल्यावर भाजपही पक्ष फोडणार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

पक्ष कसा फुटतो, हे अमित शहांना कळणार, आता दयामया नाही; संजय राऊतांचं ओपन चँलेज
| Updated on: Aug 10, 2026 | 11:27 AM
Share

6 खासदार फुटल्याची जखम ठाकरे गटावर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर संजय राऊत यांनी पुन्हा जहरी टीका केली आहे. आमची सत्ता आल्यावर पक्ष कसे फुटतात, हे आम्ही दाखवून देऊ. तेव्हाच अमित शहांना कळणार. आता मुळीच दयामया नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला ओपन चँलेच दिले आहे. संजय राऊत यांच्या चँलेजने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, ‘अमित शहा-नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा पक्ष फोडला. त्यांनी आमचा पक्ष फोडला. आम्ही त्यांना भेटणार नाही. आमचा वाद कायम राहील. नुसता पक्ष फोडला नाही. तर ऐऱ्यागैऱ्याच्या हातात दिला. हा शब्द मुद्दाम वापरतोय. कारण त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही. आमची सत्ता आल्यावर अमित शहा यांच्या मुलाच्या ताब्यातील क्रिकेट कंट्रोल बोर्डावरून त्यांना काढू. दुसऱ्याच्या हातात देऊ. क्रिकेट पक्ष हा राजकीय पक्ष नाही’.

‘शिवसेना किंवा शरद पवारांचा पक्ष असो…. त्यांनी निर्घृण, अमानुष राजकारण केलं. त्यामुळे त्यांना माफी नाही. आमच्याकडे सत्ता येईल, तेव्हा कळेल. शरद पवार हे एनडीए सोबत जाणार नाही. आमचा स्वाभिमान वेगळ्या प्रकारचा आहे. आम्ही त्यांचं तोंड देखील बघणार नाही. शरद पवारांचं राजकारण सर्वसमावेशक आहे. आमचं तसं नाही. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमचा पक्ष फोडला. चिन्ह गेलं. ऐऱ्यागैऱ्याच्या हातात दिला. आमची लढाई सुरू राहणार आहे, अशा शब्दात राऊतांनी टीका केली.

‘आमची सत्ता आल्यावर पक्ष कसे फुटतात, हे अमित शहा आणि भाजपला कळेल. हातात सत्तेत आल्यावर पक्ष कसे फुटतात, हे निर्घृणपणे दाखवून देऊल. आमचं ठरलं आहे. दयामया नाही. फोडोफोडी त्यांनी नव्या लोकशाहीत बसवली आहे. आम्हीही तसंच करणार. आम्ही काय षंढ-नामर्द आहोत का? नार्मद आहोत का? ज्या दिवशी सत्ता जाईल, भाजप रिकामी होईल. सत्ता काय करू शकते, तेव्हा कळेल. माचीसच्या बॉक्ससारखा भाजप रिकामा होईल, असं चॅलेंज संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं.

Follow Us
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
दिवाळीच्या प्रवासाचे नियोजन करताय? रेल्वे तिकीट बुकिंगमध्येच मोठा...
Diwali : दिवाळीत गावी जाण्याचा प्लॅन आहे? अत्ताच करा तयारी, नाही तर...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका