AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐऱ्यागैऱ्याकडे जात नाही; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ठाण्याचे टिकूजीराव असा उल्लेख केला आहे.

Sanjay Raut: 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐऱ्यागैऱ्याकडे जात नाही; संजय राऊत यांचा हल्लाबोल
संजय राऊतImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 09, 2026 | 11:10 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना कोणाची, यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर मोठे विधान केले आहे. त्यांनी 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐऱ्यागैऱ्याकडे कशी जाऊ शकते? असा सवाल केला आहे.

“मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे”

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अप्रत्यक्षपणे न्याय व्यवस्थेवर म्हणजे सुप्रिम कोर्टावर खासदार किंवा पक्षफुटी संदर्भात जो खटला सुरु आहे त्याबाबत सुप्रिम कोर्टावर अप्रत्यक्ष दबाव आणत आहेत. याविषयी त्यांनी (शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी) एक ठाम भूमिका मांडली. आणि ती भूमिका चुकीची नाहीये. चार वर्ष प्रलंबीत असलेला खटल्याची सुनावणी आता सुरु झाली. पक्ष आणि चिन्हाबाबत. हे जे ठाण्याचे टिकूजीराव आहेत त्यांना परस्पर पक्ष दिलाय निवडणूक आयोगाने. विधीमंडळातील आमदार सोडून गेले म्हणून. आता विधीमंडळातला पक्ष वेगळा आहे मूळ पक्ष वेगळा. मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि तो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपावला. आम्ही सगळे मूळ पक्षासोबत काम करतो आहोत.

पुढे ते म्हणाले, विधीमंडळातले 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐऱ्यागैऱ्याकडे कशी जाऊ शकते? आमदार फोडले आता खासदार फोडले आणि फुटलेले खासदार.. मी तर काल म्हणाले की प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी केटरिंग सर्विस सुरु केली आहे. गद्दारांनी यावं आणि खावून जावं. तुम्हाला गद्दारांना जेवण घालायला वेळ आहे मात्र, तृणमूळच्या, आम आदमी पार्टीच्या, शिवसेनेच्या पण संसदेमध्ये 16 दिवस झाले विरोधीपक्ष तुम्ही येण्याची मागणी करत आहे तिकडे तुम्ही येऊ शकत नाही?

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करते ते म्हणाले, या देशाच्या लोकशाहीची आणि संविधानाची इतकी विटंबना गेल्या 75 वर्षात झाली नसेल. सहा खासदारांना तुम्ही बोलवलंत. ढोकळा, फापडा, जिलबी खायला घातलीत असं खासदरा बाहेर येऊन सांगतात. त्यातल्या एका खासदाराला तुम्ही जिलबी भरवत होतात. खाओ खाओ… हे काय प्रधानमंत्र्याचं काम आहे का? तुम्ही गद्दारांना बोलावता ज्यांच्यावर गुन्हा आहे अपात्रतेचा, तुम्ही न्यायालयावर दबाव टाकताय मी यांच्या पाठीशी आहे. पण संविधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठं आहे. लक्षात घ्या. या देशाची घटना ही मोदींपेक्षा मोठी आहे आणि सुप्रिम कोर्ट देखील मोदींपेक्षा मोठं आहे. आम्हाला खात्री आहे ते निष्पक्ष न्याय देतील. आम्हाला संविधानानुसार न्याय पाहिजे. आम्हाला मेहेरबानी नको आहे किंवा न्याय विकत नको आहे हा पहिला विषय.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा