AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेची वाहतूक 40-45 मिनिटं उशिराने; मध्य रेल्वेमार्गावरही तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल

Western Railway: पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या 40 ते 45 मिनिटं उशिराने धावत आहेत. लोकलचे सध्याचे काय अपडेट्स आहेत, ते जाणून घ्या..

Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेची वाहतूक 40-45 मिनिटं उशिराने; मध्य रेल्वेमार्गावरही तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल
मुंबई लोकलImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 10, 2026 | 1:08 PM
Share

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या वेळी लोकल गाड्या उशिराने धावत असल्यामुळे चाकरमान्यांचा मनस्ताप झाला आहे. सकाळी नोकरीसाठी निघालेल्या अनेक चाकरमान्यांना त्यांच्या रोजच्या लोकल गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मवर बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर विविध ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पॉइंट्समध्ये बिघाड झाल्याने काही लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.

विविध ठिकाणी तांत्रिक बिघाड

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई रोड इथं सकाळी 4.46 वाजल्यापासून DIVA डाऊन आणि अप फास्ट मार्गावरील PT 111/112 पॉइंटमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे. बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पॉइंट क्लॅम्पिंगचं काम सुरू केलं. त्यामुळे अप फास्ट लोकलच्या वाहतुकीला विलंब होत आहे. दादर इथं सकाळी 10.10 वाजता अप फास्ट आणि डाऊन फास्ट मार्गावरील पॉइंट क्रमांक 143/144 रिव्हर्सवरून नॉर्मल स्थितीत येत नसल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली.

रेल्वे कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरू

गोरेगाव इथं सकाळी 10.22 वाजता अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील पॉइंट क्रमांक 127/128 आणि 129/130 मध्ये बिघाड झाला. बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. लोकल सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत आहेत. या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्या गोरेगाव आणि अंधेरी स्थानकांदरम्यान उशिराने धावत आहेत. यामुळे प्लॅटफॉर्मवर आणि लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच लोकलचं वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्याचे अपडेट्स

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक 40 ते 45 मिनिटं उशिराने सुरू आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. काही जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या गोंधळामुळे चाकरमान्यांना ‘लेट मार्क’चा फटका सहन करावा लागत आहे. तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरूस्त करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मध्य रेल्वेचीही वाहतूक उशिराने

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते सीएसटीदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून रेल्वे सेवा पूर्वपदावर येण्यासाठी काही अवधी लागणार आहे.

कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल 30 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल गाड्या 20 ते 25 मिनिट उशिराने धावत आहेत. मुलुंड ते ठाणे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर एकामागे एक लोकल गाड्या उभ्या आहेत.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा