AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 लाख घ्या, पण भावाला वाचवा… डोळ्यासमोरच भाऊ गेला वाहून; त्या घटनेने सर्वच हादरले

देवप्रयाग येथे कांवड यात्रेदरम्यान एका कावडियाचा गंगा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला. लहान भावाला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने '5 लाख देतो, वाचवा!' अशी आर्त हाक दिली, पण गंगेच्या रौद्र प्रवाहापुढे तो हतबल ठरला. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

5 लाख घ्या, पण भावाला वाचवा... डोळ्यासमोरच भाऊ गेला वाहून; त्या घटनेने सर्वच हादरले
लहान भावाला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने फोडला टाहो
| Updated on: Aug 10, 2026 | 12:36 PM
Share

“ अरे 5 लाख रुपये देतो मी, पैसे घ्या… पण माझ्या भावाला वाचवा… माझ्या भावाला पकडा हो…!” आपल्या भावाला वाचवण्यासाठी मोठ्या भावाच्या तोंडून निघणारी ही आर्त हाक ऐकून कोणाच्याही काळजात चर्र होईल, काळीज फाटेल पण… डोळ्यांसमोर आपला लहान भाऊ गंगेच्या प्रचंड प्रवाहात वाहून जात असताना त्याला वाचवण्यासाठी एका भावाने केलेली ही शेवटची धडपड मन हेलावून टाकणारी आहे. देवप्रयाग येथील टोंडेश्वर घाटावर खरंतर अतिशय सुंदर वातावरण… खळाळतं पाणी, त्याचा मोहून टाकणारा आवाज आणि वेगळीच एक शांतता. कोणालाही आवडेल असं नयनरम्य वातावरण असतं खरंतर तिथे. पण काही दिवसांपूर्वी देवप्रयाग येथील टोंडेश्वर घाटावर कांवड यात्रेदरम्यान एक अतिशय दुर्दैवी, काळीज पिळवटून टाकणारी अशी घटना घडली. गंगा स्नान करत असताना एक कांवडिया अचानक नदीच्या वेगवान आणि विक्राळ प्रवाहाच्या तडाख्यात सापडला. आणि बघता बघता तो गायब झाला. अवघ्या काही क्षणांतच पाण्याच्या लाटांनी त्याला आपल्यासोबत ओढून नेलं. काठावर उभ्या असलेल्या मोठ्या भावाने हे दृश्य पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

याचा एक व्हिडीओ तर समोर आला, पण ती आर्त हाक ऐकूनही एकाचंही पाऊल मदतीसाठी पुढे आलं नाही. अनेक लोकं तिथे होतं, काहींनी तर त्या भावाचा आक्रोश कॅमेऱ्यात टिपलाही, पण त्याच्या भावाला वाचवण्यासाठी मदतीला कोणी आलं नाही, अनेक  जण तिथे उभे होते, पण मदतीची याचना ऐकूनही एकानेही पुढे धाव घेतली नाही.

भावाचा जीव वाचवण्यासाठी केली विनंती

आपल्या डोळ्यांदेखत भाऊ पाण्यात वाहून जात असताना पाहून तो हादरला, काय करावं हे त्याला क्षणभर सुचेनासं झालं. भावाला वाचवण्यासाठी तो नदीकिनारी असलेल्या लोकांकडे धावला. डोळ्यांत अश्रू, आवाजात आर्तता आणि मनात भावाला वाचवण्याची शेवटची आशा घेऊन तो गयावया करत होता. “अहो मी 5 लाख देतो, पैसे देतो, पण माझ्या भावाला वाचवा… त्याला वाचवा हो..” एका भावाचा हा टाहो ऐकून उपस्थितांच्याही काळजाचा ठोका चुकला. पैसे देऊन का होईना, पण आपल्या भावाचा जीव वाचावा, एवढीच त्याची धडपड होती. मात्र समोर गंगेचा रौद्र अवतार होता. पावसामुळे नदीचा प्रवाह प्रचंड वेगाने वाहत होता. काही क्षणांतच मोठ्या भावाची धडपड, आर्त विनवणी आणि मदतीच्या हाका चित्कारात बदलल्या.

लहान भावासाठी मोठा भाऊ हतबल

ज्याच्यासोबत बालपण घालवलं, मोठा झाला, ज्याला शिकवलं, तोच भाऊ डोळ्यांसमोर नदीच्या प्रवाहात नाहीसा होताना पाहण्याची वेळ या भावावर आली. त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ अक्षरशः हतबल झाला; मात्र गंगेच्या प्रचंड प्रवाहापुढे त्याची सारी धडपड अपुरी पडली. काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मोठा भाऊ आपल्या भावाला वाचवण्यासाठी लोकांकडे मदतीची याचना करताना दिसतोय. त्याचा थरथरता आवाज, डोळ्यांतील अश्रू आणि भावाला गमावण्याची भीती पाहून हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू न आले तरच नवल !

या दुर्दैवी घटनेनंतर टोंडेश्वर घाटावर काही काळ एकच गोंधळ उडाला. भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. कांवड यात्रेमुळे गंगा घाटांवर मोठ्या संख्येने भाविक गर्दी करताना दिसतात. मात्र सध्या मान्सूनचा काळ असल्याने गंगेचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि धोकादायक झाला आहे. दरम्यान लोकांनी,तसेच भाविकांनी नदीच्या फार जवळ जाऊ नये, जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. नदीकाठाजवळ सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा