Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. आगामी काळात सत्ता परिवर्तन झाल्यास भाजपला त्यांच्याच राजकीय पद्धतीने उत्तर देण्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. आगामी काळात सत्ता परिवर्तन झाल्यास भाजपला त्यांच्याच राजकीय पद्धतीने उत्तर देण्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे.
“वारंवार म्हणतो, आमची सत्ता आली की आम्ही दाखवून देऊ. मग पक्ष कसे फुटतात हे भाजपला कळेल, अमित शाहांना कळेल,” असं संजय राऊत म्हणाले. सत्तेचा वापर करून पक्ष फोडण्याची पद्धत भाजपने दाखवून दिली असून, सत्ता हातात आल्यानंतर पक्ष कसे फोडले जातात हे त्यांच्यापेक्षाही निर्घृण पद्धतीने दाखवू शकतो, अशी आक्रमक भूमिका राऊत यांनी मांडली.
“ज्या दिवशी सत्ता जाईल, तेव्हा 80 टक्के भाजप आपोआपच खाली होणार आहे,” असा दावा करत संजय राऊत यांनी सत्तेच्या ताकदीवरही भाष्य केलं. सत्ता काय करू शकते आणि सत्तेची पोलादी पकड काय करू शकते, हे त्यावेळी भाजपला समजेल, असा टोला त्यांनी लगावला.
यापुढे बोलताना राऊत यांनी भाजपची तुलना “माचिसच्या रिकाम्या बॉक्सशी” केली. “काहीही न करता भाजप माचिसचा रिकामा बॉक्स असतो ना, तसा रिकामा होईल,” असं वक्तव्य त्यांनी केलं.
संजय राऊत यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि ठाकरे गटातील संघर्षाला धार येण्याची शक्यता आहे. राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Aug 10, 2026 11:11 AM
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा

