असा एक देश जिथल्या महिला आंघोळच करत नाहीत, तरीही सौंदर्यवती म्हणून गौरव; कुठे घडतं हे माहीत आहे का?
अंघोळ न करता 'या' महिला स्वतःला कशा ठेवतात स्वच्छ आणि सुगंधीत, 'या' देशातील महिलांना नाही अंघोळ करण्याची परवानगी... गेल्या अनेक वर्षांची आणि परंपरा... जाणून व्हाल थक्क

तसं पाहायला गेलं तर, महिला स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करत असतात. पण जगात असा देखील एक देश आहे, जेथे महिलांना अंघोळ करण्याची परवानगी नाही. जगात असे अनेक आदिवासी क्षेत्र आहेत जिथे राहणाऱ्या लोकांच्या चालीरीती आणि पद्धती अत्यंत अद्वितीय आहेत. असाच एक आदिवासी समाज आफ्रिकेतील उत्तर नामिबियातील कुनान प्रांतात राहतो. येथे राहणाऱ्या हिंबा जमातीच्या महिलांना आंघोळ करण्याची परवानगी नाही. तरीही या महिलांना आफ्रिकेतील सर्वात सुंदर महिलांचा दर्जा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुनान प्रांतात राहणाऱ्या हिंबा जमातीची एकूण लोकसंख्या 20 हजार ते 50 हजार आहे. हिंबा जमातीच्या महिलांना आफ्रिकेतील सर्वात सुंदर महिला म्हटलं जातं. पण सांगायचं झालं तर, येथील महिलांनी अंघोळीची परवानगी नाही. एवढंच नाही तर, येथील महिलांना पाण्याने हात स्वच्छ करण्याची देखील परवानगी नाही. पण स्वतः स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महिला एका खास उपाय करतात.
हिंबा जमातीच्या महिला आंघोळ करण्याऐवजी, पाण्यात विशेष औषधी वनस्पती उकळून आणि त्याचा धूर वापरून स्वतः शरीर ताजेतवाने ठेवतात जेणेकरून त्यांना दुर्गंधी येऊ नये. या औषधी वनस्पतीच्या सुगंधामुळे, आंघोळ न केल्यानंतरही त्यांच्या शरीराला चांगला वास येतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या जमातीतील महिला त्यांच्या लग्नाच्या दिवशी आयुष्यात फक्त एकदाच पाण्यात स्नान करतात. ही हजारो वर्षांची परंपरा आहे.
हिंबा जमाजातील महिला स्वतःच्या त्वचेचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी एक विशेष प्रकारचं लोशन लावतात. हे लोशन प्राण्यांच्या चरबी आणि हेमॅटाइट धुळीपासून तयार केलं जातं. हेमॅटाईटच्या धुळीमुळे त्यांच्या त्वचेचा रंग लाल होतो. हे विशेष लोशन त्यांना कीटकांच्या चाव्यापासून देखील वाचवतं. हिंबा समाजातील महिलांना रेड मॅन म्हणूनही ओळखले जाते.
प्रेग्नेंसीमध्ये कसं या महिलांचं आयुष्य?
हिंबा जमातीमध्ये, बाळाच्या जन्मानंतर त्याची जन्मतारीख कधीच विचारात घेतली जात नाही, तर ज्या दिवशी स्त्री बाळाबद्दल विचार करू लागते, त्याच दिवसापासून बाळाचा जन्म झाला असं मानलं जातं. आई होण्यासाठी, जमातीतील महिलांना मुलांशी संबंधित गाणी ऐकावी लागतात…
