‘धुरंधर 2’, ‘पुष्पा 2’ सोडा जगभरात ‘या’ सिनेमांनी गाजवला बॉक्स ऑफिस, ‘रामायण’ कितव्या स्थानावर?

तगडी स्टारकास्ट असलेला 'रामायण' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. पण 'रामायण' पूर्वी असे सिनेमें प्रदर्शित झाले ज्यांनी बॉक्स ऑफिस गाजवला आहे... 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' सोडा जगभरात 'या' बॉलिवूड सिनेमांनी नवे विक्रम रचले आहेत...

धुरंधर 2, पुष्पा 2 सोडा जगभरात या सिनेमांनी गाजवला बॉक्स ऑफिस, रामायण कितव्या स्थानावर?
| Updated on: Nov 16, 2026 | 2:30 PM

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी स्टारर ‘रामायण’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. पण ‘रामायण’ हा पहिलाच सिनेमा नाही, ज्याने 1000 कोटांचा गल्ला पार केला आहे. ‘धुरंधर 2’, ‘पुष्पा 2’ सिनेमाने देखील फक्त भारतातच नाही जगभरात अनेक रेकॉर्ड ब्रेक करत मोठा इतिहास रचला आहे. सांगायचं झालं तर, याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ (Dhurandhar 2: The Revenge) हा सिनेमा सध्या भारतात सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर रणबीर कपूरचा ‘रामायण’ (Ramayana) आहे. मात्र, जागतिक स्तरावर (वर्ल्डवाइड) ‘दंगल’ (Dangal) अद्यापही पहिल्या स्थानावर कायम आहे. 2 हजार कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या आमिर खानच्या या सिनेमाला आतापर्यंत कोणताही भारतीय चित्रपट मागे टाकू शकलेला नाही.

‘सॅकनिल्क’च्या (Sacnilk) आतापर्यंतच्या बॉक्स-ऑफिस आकडेवारीनुसार, जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाच भारतीय सिनेमाबद्दलची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये ‘दंगल’ पहिल्या स्थानावर आहे तर, ‘रामायण’ शेवटच्या स्थानावर आहे.

Loading...

दंगल : आमिर खान स्टारर ‘दंगल’ वर्ल्डवाइड सर्वात जास्त कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला आहे. या सिनेमाचा रेकॉर्ड आतापर्यंत कोणताच सिनेमा मोडू शकलेला नाही, जगभरात सिनेमाने 2,070.30 कोटी रुपयांची कमाई केली. तर 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ सिनेमाने परदेशात विशेषतः चीन मध्ये बक्कळ कमाई केली.

धुरंधर 2: द रिवेंज : जगभरातील टॉप 5 भारतीय सिनेमांच्या यादीत ‘धुरंधर 2’ (Dhurandhar 2) दुसऱ्या क्रमांकावर आहे. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनीत या स्पाय अॅक्शन ड्रामाने जगभरात 1,813.39 कोटी रुपयांची कमाई केली होती. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बॉक्स-ऑफिस यशांपैकी एक ठरला आहे.

बाहुबली 2: द कन्क्लूजन : यादीत तिसऱ्या क्रंमाकावर ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ सिनेमा आहे. सिनेमाने जगभरात 1,788.06 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमात
प्रभास, राणा दग्गुबाती आणि अनुष्का शेट्टी यांनी महत्त्वाची भूमिका साकरालेली.

पुष्पा 2: द रूल : अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2: द रूल’ (Pushpa 2: The Rule) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सिनेमाने जगभरात 1.742.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिक्वेलला त्याच्या पहिल्या भागाच्या लोकप्रियतेचा मोठा फायदा झाला आणि हा सिनेमा संपूर्ण भारतात बॉक्स-ऑफिसवर एक मोठा हिट ठरला होता.

रामायण : या यादीत पाचव्या क्रमांकावर रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश अभिनीत ‘रामायण’ (Ramayana) आहे. या सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या 11 दिवसांतच जगभरात 1384.50 कोटी रुपयांची कमाई करून कमाल केली आहे. सिनेमा अद्यापही चित्रपटगृहांमध्ये कमाई करता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटींची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us