काम हवंय, शारीरिक संबंध ठेवावेच लागतील…, वयस्कर व्यक्तीची अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, नीम करोली बाबांच्या भक्तीने वाचवलं
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्याकडे पुरुषांनी विचित्र मागणी केली आहे. आता देखील एक अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला भयानक प्रसंग सांगितला आहे. अभिनेत्रीकडे वयस्कर पुरुषाने विचित्र मागणी केलेली. पण नीम करोली बाबांच्या भक्तीने अभिनेत्रीला थोडक्यात वाचवलं...

इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करणं अभिनेत्रींसाठी फार कठीण असतं. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं. अभिनेत्रीने सांगितल्यानुसार, वयस्कर पुरुषाने तिच्याकडे विचित्र मागणी केलेली. ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड घाबरलेली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगलेली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री युक्ती कपूर आहे. युक्ती हिचं कुटुंब फिल्मी विश्वातील नसल्यामुळे तिला भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. याबद्दल खुद्द अभिनेत्रीने घडलेली घटना सांगितली आहे.
कास्टिंग काउचबद्दल युक्ती कपूर म्हणाली, ‘एकदा निर्मात्याने मला मिटिंगसाठी बोलावलं होतं. निर्मात्यांनी बोलावलं म्हणून मी प्रचंड आनंदी होती. पण भेटल्यानंतर त्या निर्मात्याने माझ्याकडे विचित्र मागणी केली. निर्माता मला म्हणाला, तुला माझ्यासोबत पार्टी करावी लागेल… तुला माझी सिक्रेट गर्लफ्रेंडम्हणून राहावं लगेल… त्याची मागणी ऐकून मला मोठा धक्का बसला. मला भीती वाटत होती. कारण माझं वय फार कमी होतं.’
‘मला असं वाटलं तेथून पळ काढता येणार नाही. दरवाजा लावला आहे, याची भीती मला होती. माझ्यासोबत कोणी चुकीचं तर करणार नाही ना? याची भीती माझ्या मनात होती. तो निर्माता वयस्कर होता. मी त्याच्यासमोर लहान मुलगी होती. तेव्हा मी फक्त 22 – 23 वर्षांची होती.’, युक्ती हिने अन्य एक घटना देखील सांगितली.
अभिनेत्री म्हणाली, ‘जाहिरातीसाठी कास्टिंग होत होती. तेथे एक व्यक्ती होती, माझं ऑडिशन झाल्यानंतर मला फोन आला आणि त्याने मला फोन केला. त्याने सांगितलं जाहिरातीत शाहरुख, सलमान खान आणि सैफ अली खान सगळेच आहेत. मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. दुसऱ्या दिवशी त्याने फोन करून सांगितलं की डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि कलाकारांसोबत… मी शॉक झाले. अभिनेता कोण आहे, हे कन्फर्म करून सांगू शकतो. पण डायरेक्टर आणि प्रोड्यूसरसोबत मात्र झोपावंच लागेल. नंतर मला कळलं की तो कास्टिंग डायरेक्टर नव्हताच.”
नीम करोली बाबांना वाचवलं…
नीम करोली बाबा यांचे आभार मानत अभिनेत्री म्हणाली, “नीम करोली बाबा आणि हनुमानजींचे आभार, त्यांनी मला वाचवलं. मी खाली गेले, तेव्हा एका मुलीने मला सांगितलं की हा माणूस फ्रॉड आहे. तू त्याच्यासोबत झोपलीस तरी तुम्हाला काम मिळणार नाही.’ तेव्हा युक्ती कपूरने तरुण मुलींना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्या या दलदलीत अडकू नयेत. तिने फेक कास्टिंग डायरेक्टर्सपासून सावध राहण्यास सांगितलं. कारण कास्टिंगच्या नावाखाली सध्या मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. ‘