नाशिक सिंहस्थ कुंभ मेळ्यात महागंगा आरतीचा सोहळा रंगला, 6,500 आदिवासी बांधवांचा सहभाग, गिनिज बुकात होणार नोंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ मेळा 2027 ची सुरुवात ध्वजा रोहणाने होत आहे. भारतीय संस्कृतीची थोरवी गाणारा हा सोहळा हिंदू धर्मियांच्या सर्वात मोठा धार्मिक सोहळा असून यातील स्नानाला खूप महत्व आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ मेळ्याची सुरुवात ध्वजारोहणाने होत आहे. या सोहळ्याला भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सनातन धर्म श्रद्धेचे महापर्व मानले जाते. दोन वर्षे हा सोहळा रंगणार असून या सोहळ्यात आज महागंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत साडेसहा हजार आदिवासी महिला आणि पुरूष भाविकांनी या गंगा महाआरतीमध्ये सहभाग घेतला. यावेळी संपूर्ण वातावरण धार्मिक आणि पवित्रमय झाले होते. या नयमरम्य सोहळ्याची नोंद गिनीज बुकमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे.
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात ध्वजा रोहणाने झाली आहे. यावेळी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत डोळ्यांची पारणे फेडणारी महागंगाआरतीचा सोहळा रंगला. या महागंगा आरतीची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. दिव्यांच्या लखलखाटात संपूर्ण गोदाघाट उजळलेला होता. या महागंगा आरतीचा आनंद घेण्यासाठी गोदाघाट जवळील परिसरातील शहरवासी टेरेसवर उभे राहीले होते. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहीले होते. या सर्व मान्यवरांसमोर या गंगाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नाशिक कुंभ मेळ्याची सुरुवात साल २०२६ च्या अखेरीस होणार आहे. तर मुख्य धार्मिक आयोजन आणि अमृत स्नान साल २०२७ मध्ये आयोजित केले जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रमांची सांगता २४ जुलै २०२८ रोजी होणार आहे. सुमारे दोन वर्षे चालणाऱ्या या धार्मिक महापर्वात कोट्यवधी श्रद्धाळू गोदावरीच्या पवित्र किनाऱ्यावर पवित्र स्नान करतील