चिमुरडीचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा डान्स झाला तुफान व्हायरल…झिंगाट तर कधी दरिया किनारी…

नाशिकच्या नाशिकरोड परिसरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर त्यांनी हा डान्स केला आहे. दरिया किनारी... झिंगाट अशा विविध गाण्यांवर नागरिकांनी डान्स केला याचवेळी पोलिस कर्मचारी, अधिकारी यांनाही मोह आवरला नाही. त्यांनीही दिवसभराचा थकवा दूर करत डान्स केला.

चिमुरडीचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा डान्स झाला तुफान व्हायरल...झिंगाट तर कधी दरिया किनारी...
Image Credit source: The dance of a little girl and a police officer went viral
| Updated on: Sep 10, 2022 | 12:56 PM

नाशिक : पोलीस अधिकारी (Policeofficer) आणि एका चिमुरडीचा व्हायरल झालेला डान्स ( Viraldance ) तुम्ही पाहिला असेल. दरिया किनारी… या गाण्यावर पोलीस अधिकारी आणि चिमुरडीने ठेका धरल्याचे त्यात दिसून येत आहे. पोलीस अधिकारीही एकदमच भन्नाट डान्स करत असल्याने तो अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. नेटकरी त्या व्हिडिओला (SocialMedia ) शेयर करत पसंती दर्शवत आहे. विशेष म्हणजे हा डान्स कुठला आहे ? कोण आहे हे पोलीस अधिकारी ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण त्याचे उत्तर आता मिळाले आहे.

चिमुरडी आणि पोलीस अधिकारी यांचा हा डान्स गणेश विसर्जन मिरवणुकीतील आहे. नाशिकच्या नाशिकरोड परिसरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर त्यांनी हा डान्स केला आहे.

दरिया किनारी… झिंगाट अशा विविध गाण्यांवर नागरिकांनी डान्स केला याचवेळी पोलिस कर्मचारी, अधिकारी यांनाही मोह आवरला नाही. त्यांनीही दिवसभराचा थकवा दूर करत डान्स केला.

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचा चिमुरडी सोबत दारिया किनारी डान्स एका रात्रीत तूफान व्हायरल झाला आहे.

दसक जेलरोड येथे विसर्जन मिरवणुकीनिमित्त पोलिसनातर्फे आयोजित रंगारंग कार्यक्रमात पोलिसांनी विविध गाण्यावर ठेका धरला होता. मी मराठी गीत मराठी या कार्यक्रमात गीते सादर केली जात होती.

एरवी सण-उत्सवात कायम बंदोबस्तात असणारे पोलिस, सण उत्सव साजरा करता येत नसल्याने सगळे शांततेत पार पडल्यानंतर आनंदोत्सव साजरा करत असतात त्याचच एक भाग म्हणून पोलिसांनी मिरावणुकीनंतर डान्स केला.

नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी केलेल्या डान्सची सोशल मिडियावर चर्चा होऊ लागली आहे. अनेकांनी तो सोशल मिडियावर शेयर देखील केला आहे.