काँग्रेस-राष्ट्रवादीत सर्व मुद्द्यांवर एकमत, मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप ठरलेलं नाही : पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) दिली. 

काँग्रेस-राष्ट्रवादीत सर्व मुद्द्यांवर एकमत, मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप ठरलेलं नाही : पृथ्वीराज चव्हाण
Follow us
| Updated on: Nov 21, 2019 | 5:02 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) वेगवान घडामोडी घडत आहेत. बुधवारी (20 नोव्हेंबर) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साडेपाच तासांच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीपूर्वी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आणि नंतर एकत्र बैठक झाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) दिली.

“काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात एकमत आहे. त्यानंतर उद्या (22 नोव्हेंबर) आम्ही मुंबईत जाऊन आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करु. या चर्चेनंतर शिवसेनेशी चर्चा करु,” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आमचं पूर्ण एकमत झालं आहे. उद्या आम्ही मुंबईला जाऊन घटकपक्षांशी चर्चा करु. यावेळी त्यांना आतापर्यंत घडलेल्या चर्चेची माहिती देऊ. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करु,” असं पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलेलं नाही, दिल्लीतील बैठक झाली, आता मुंबईत चर्चा करु, सर्व चर्चा झाल्यानंतर माध्यमांना माहिती देऊ,” असेही पृथ्वीराज चव्हाण (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) म्हणाले.

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरु झाली. या बैठकीसाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खर्गे, के सी वेणूगोपाल, बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही बैठक सुरु होती. या दोन्ही बैठकांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

संजय राऊत मुंबईकडे रवाना

दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना नेते संजय राऊत हे दिल्लीतून मुंबईकडे रवाना झाले आहे. त्यामुळे आता मुंबईत सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरु होणार आहेत.

उद्या मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीची घटकपक्षांशी बैठक

तर दुसरीकडे उद्या सकाळी 11 वाजता मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मित्रपक्षांशी आघाडी चर्चा करणार आहे. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक होईल. तसेच संध्याकाळी 4च्या सुमारास काँग्रेसच्या आमदारांची विधानभवनात बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता निवडला (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) जाईल.

चर्चा आणि आराखडे 

मुख्यमंत्रिपद जर शिवसेनेला पाच वर्षांसाठी दिलं, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद पाच वर्ष पूर्णवेळ मिळेल. उपमुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीकडून अजित पवार असू शकतात.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे

अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद जर राष्ट्रवादी-शिवसेनेत विभागलं गेलं, तर काँग्रेसचा उपमुख्यमंत्री पाच वर्ष पूर्णवेळ राहील, अशी चर्चा आहे.

महासेनाआघाडी नव्हे महाविकासआघाडी

तीन पक्षांच्या आघाडीला दिलेल्या नावावरुन काँग्रेसची नाराजी असल्याची चर्चा आहे. ‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या माध्यमांनी ठेवलेल्या नावाला काँग्रेसचा आक्षेप आहे. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवल्याची माहिती आहे.

‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या नावातून केवळ शिवसेना या एकाच पक्षाचं नाव अधोरेखित होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नावाचा यामध्ये उल्लेख होत नाही. सर्वच पक्षांच्या नावांचा समावेश करण्याचा आग्रह धरण्याऐवजी कोणाचंच नाव समाविष्ट करु नये. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव ठेवण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं (NCP Wants CM in Maharashtra) आहे.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.