विधानसभेला पडल्याने पंकजाताईंना विधानपरिषद तिकीट नाकारलं, मग पडळकरांना कसं दिलं? खडसेंचा सवाल

चंद्रकांतदादा मुळात भाजपमध्ये आता आलेले आहेत. भाजपशी त्यांचा संबंध तीन-चार वर्षांमध्ये मंत्रिमंडळात आल्यापासून झाला, असा घणाघातही खडसेंनी केला (Eknath Khadse on Pankaja Munde Vidha Parishad Candidature)

विधानसभेला पडल्याने पंकजाताईंना विधानपरिषद तिकीट नाकारलं, मग पडळकरांना कसं दिलं? खडसेंचा सवाल
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 11:20 AM

जळगाव : चंद्रकांतदादा सोयीनुसार नियम सांगतात. पंकजा मुंडे यांना तिकीट का दिलं नाही? तर विधानसभेत त्या हरल्या म्हणून. मग गोपीचंद पडळकर विधानसभेत हरले, त्यांना का देण्यात आलं? असा प्रश्न विचारत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. (Eknath Khadse on Pankaja Munde Vidha Parishad Candidature)

चंद्रकांतदादा त्यांच्या सोयीचे निकष लावतात. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने सलग विधानपरिषदेचे तिकीट देत नाहीत, असा त्यांचा दावा आहे, मग गोपीचंद पडळकर विधानसभेत हरले, त्यांना का देण्यात आलं? असा सवाल खडसेंनी विचारला. बारामती मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर उभे राहिलेल्या गोपीचंद पडळकरांना अजित पवारांकडून मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला होता.

वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. चंद्रकांत पाटलांना भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण कार्यकर्त्यांची माहिती नाही. ते दुसरीकडून माहिती घेऊन बोलत आहेत चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत आहेत. त्यांना काय माहिती भारतीय जनता पार्टीमध्ये किती खस्ता खाल्ल्या? असा सवालही खडसेंनी विचारला.

पडळकर राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे होते. अगदी लोकसभेच्या तिकीटासंदर्भात पाहिलं, तर पडळकर यांनी हार्दिक पटेलला आणलं होतं. त्यांनी मोदीजींन शिव्या घातल्या, हे मला सांगायची गरज नाही. युट्युबवर आता जा आणि हार्दिक पटेल यांची भाषण तुम्ही ऐकू शकता. अशा व्यक्तींना भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही तिकीट दिल्याने आम्ही नाराज आहोत, असं खडसेंनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : चंद्रकांतदादांचा भाजपशी संबंध चार वर्षांचा, खडसेंचा घणाघात, अध्यक्षपद सोडून मार्गदर्शन करण्याचा टोला

“चंद्रकांत पाटील यांचा भाजपशी काहीही संबंध नसून गेल्या तीन-चार वर्षांपासून ते भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे ते चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत आहेत. त्यांनीच अध्यक्षपद सोडून मार्गदर्शनाचे काम केले, तर अधिक सोयीचे होईल” असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला. काँग्रेसशी माझा कधीही दुरान्वये संबंध नव्हता, असं सांगत विधानसभेच्या वेळी मला टाळून जबरदस्ती माझ्या मुलीला तिकीट दिला गेल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

गेली चाळीस वर्ष भारतीय जनता पक्षासाठी मी काम करतोय. चंद्रकांतदादांना बरीचशी चुकीची माहिती आहे. कारण चंद्रकांतदादा मुळात भाजपमध्ये आता आलेले आहेत. भाजपशी त्यांचा संबंध तीन-चार वर्षांमध्ये मंत्रिमंडळात आल्यापासून झाला. यापूर्वी भाजपमध्ये ते कधीही कार्यरत नव्हते. ते विद्यार्थी परिषदमध्ये कार्यरत होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा चाळीस वर्षांचा इतिहास त्यांना जेवढा सांगितला तेवढाच ते बोलतात, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.

“चंद्रकांतदादा कोणत्या मोर्चामध्ये दिसले?”

1980 मध्ये भारतीय जनता पार्टीची चौपाटीवर स्थापना झाली, त्या ठिकाणी मी हजर होतो. 1982 मध्ये आळंदीला विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हिंदू संमेलन झालं, त्या संमेलनात मी उपस्थित होतो. त्यानंतर 1983 ला तळजाईला तीन दिवसांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर होतं, हे तीनही दिवस मी उपस्थित होतो. 1982 पासून 1992 पर्यंत मी पंचायत समितीचा सदस्य होतो. भारतीय जनता पार्टीचे काम करत होतो. मला वाटतं की चंद्रकांतदादा मुळात भाजपमध्ये नव्हतेच, त्यामुळे चुकीच्या माहितीच्या आधारावर ते बोलले आहेत, असं खडसे म्हणाले.

भाजपमध्ये चंद्रकांत पाटलांनी कोणत्या मोर्चामध्ये भाग घेतला? कुठल्या आंदोलनात भाग घेतला? जेव्हा शेगावला धनगर मोर्चा निघाला, तेव्हा आम्ही होतो. काश्मीरच्या आंदोलनालाही मी हजर होतो. 1982 मध्ये कापूस महागाईसाठी काढलेल्या मोर्चात मी, गोपीनाथ मुंडे आणि पांडुरंग फुंडकर होतो. त्या काळात दादा कुठे होते भाजपमध्ये? असा प्रश्नही खडसेंनी उपस्थित केला.

भारतीय जनता पार्टीमध्ये मलाही संधी मिळाली ती निवडून येणारी जागा म्हणून मिळाली होती. मुक्ताईनगर हा मतदारसंघ काँग्रेसचा होता. प्रतिभाताई पाटील 23 वर्ष या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. या ठिकाणी मला निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली त्यामुळे मी निवडून आलो, असं खडसेंनी स्पष्ट केलं.

“अध्यक्षपद सोडून मार्गदर्शन करा”

मला वाटतं चंद्रकांतदादा विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपत आले, तर ते अधिक सीनियर आहेत. त्यांनी या ठिकाणी आपले अध्यक्षपद सोडून मार्गदर्शनाचे काम केलं, तर अधिक सोयीचे होईल. त्यांनी मार्गदर्शन करायला काय हरकत आहे? मी तर इतके वर्ष मी मार्गदर्शनच करत आलो, अजूनही करत राहीन, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.

मुक्ताईनगरसारख्या अवघड जागेवर मला तिकीट दिलं, मी निवडून येत गेलो. यावेळी मुक्ताईनगरची जागा का नाही आली? मी कुठे मुलीला तिकीट मागितले होते? माझ्या मुलीला तिकीट जबरदस्ती दिलं गेलं, असा दावाही खडसेंनी केला.

हेही वाचा : 7 वेळा आमदारकी, सुनेला खासदारकी, मुलीला तिकीट, मुलाला उमेदवारी, नाथाभाऊंना आणखी काय हवं? : चंद्रकांत पाटील

आम्ही चाळीस वर्षापासून पक्षाचं काम करत असू, तर आम्हाला तिकीट मागायचा हक्क आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीची कोणती सेवा केली आहे? विद्यार्थी परिषदेमध्ये तुमचं मोठं काम आहे. विद्यार्थी परिषदेमध्ये प्रामाणिकपणे तुम्ही अनेक वर्ष काम केलं. विद्यार्थी परिषदेच्या एका पदावर तुमचा अधिकार हक्क आहे, तसाच भारतीय जनता पार्टीमध्ये माझा आहे, असा घणाघातही खडसेंनी केला.

चंद्रकांतदादा सोयीनुसार नियम सांगतात. पंकजा मुंडे यांना तिकीट का दिलं नाही? तर विधानसभेत त्या हरल्या म्हणून दिलं नाही. मग पडळकर विधानसभेत हरले, त्यांना का देण्यात आलं? चंद्रकांतदादा त्यांच्या सोयीचे निकष लावतात. त्यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. चंद्रकांत पाटलांना भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण कार्यकर्त्यांची माहिती नाही. ते दुसरीकडून माहिती घेऊन बोलत आहेत चुकीच्या माहितीच्या आधारावर बोलत आहेत. त्यांना काय माहिती भारतीय जनता पार्टीमध्ये किती खस्ता खाल्ल्या? असा सवालही खडसेंनी विचारला. (Eknath Khadse on Pankaja Munde Vidha Parishad Candidature)

“तशी दानवे-विखे यांच्यामध्ये पण घराणेशाही”

घराणेशाहीचा मुळात काहीही संबंध नाही. माझ्याकडे जर पाहिलं तर एक खासदार भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून येतो, या दोनच्या पलीकडे तिसरा कोण आहे? महानंदाची जागा असेल, बँकेची जागा असेल, सहकाराच्या माध्यमातून निवडून आलो, भारतीय जनता पार्टीचा दुरान्वये संबंध त्या ठिकाणी नाही. महानंदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने माझी बायको त्या ठिकाणी अध्यक्ष झाली. जिल्हा बँकेला शिवसेना-भाजप-काँग्रेस यांची युती आहे. त्या ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका झालेल्या नाही. सहकारामध्ये नेहमीच अशा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे घराणेशाहीचा संबंधच नाही. अशी घराणेशाही पाहिली, तर मग आमचे मंत्रीमहोदय रावसाहेब दानवे मंत्री आहेत, त्यांचा मुलगा आमदार आहे. विखे पाटील साहेब आमदार, त्यांचा मुलगा खासदार आहे, अशा कानपिचक्या खडसेंनी लगावल्या.

“महानंदाचा भाजपशी संबंध नाही”

शंभर वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा माणूस जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये चेअरमन झाला. महानंदाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा जनता पार्टीच्या विचारांचा माणूस त्याठिकाणी अध्यक्ष झाला आणि तोही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने झाला. भारतीय जनता पार्टीमधून महानंदामध्ये फक्त दोन सदस्य आहेत, जिल्हा बँकेत पाहिली तर चार सदस्य आहेत चार आणि दोन सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा चेअरमन होणं हे सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले, कारण हे राजकारणविरहित अशा स्वरूपाच्या निवडणुकाही आम्ही लढवल्या त्या जिंकल्या. आणि तेही भारतीय जनता पार्टीच्या चिन्ह शिवाय निवडून आलेलो आहे, असं एकनाथ खडसे यांनी सपष्ट केलं.

चंद्रकांतदादांशी अजून माझं फोनवर बोलणं झालेलं नाही, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याशी काल फोनवर बोलणं झालेलं होतं. त्यांनी सांगितलं की त्यासंदर्भात काही विषयावर आपल्याला चर्चा करता येईल, असं खडसेंनी सांगितलं.

लॉकडाऊननंतरची भूमिका काय, त्याचा अजून तरी मी विचार केलेला नाही. अजून तरी भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रमुख कार्यकर्ते आहेत, ते माझ्याशी बोलत आहेत, त्या प्रमुख लोकांशी चर्चा करून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांकडे वस्तुस्थिती मांडावी, असं खडसे म्हणाले.

“थोरातांकडून आजही स्वागत”

बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी तुम्ही उभी राहा अशी विनंती मला केली होती आणि त्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक आमदाराशी बोलत असताना 6 -7 आमदारांनी आम्ही क्रॉस वोटिंग करायला तयार आहोत, अशी संमती दिली होती, परंतु मला काँग्रेसकडून उभे राहायची इच्छा नव्हती. म्हणून मी काँग्रेसकडून उभा राहिलो नाही. परंतु आजही बाळासाहेब थोरात म्हणतात की एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये येत असतील, तर त्यांचा उचित सन्मान ठेवला जाईल आणि त्यांचं आम्ही स्वागत करु, असं खडसेंनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

खडसेंचं निश्चित स्वागत करु, बाळासाहेब थोरातांकडून एकनाथ खडसेंना खुली ऑफर

विधानसभेनंतर लगेच विधानपरिषद तिकीट दिलं नसेल, पंकजा मुंडे मॅच्युअर्ड : चंद्रकांत पाटील

माझं तिकीट, माझा मतदारसंघ हिसकावला, असं माझं काही नसतं, सगळं पक्षाचं असतं : चंद्रकांत पाटील

(Eknath Khadse on Pankaja Munde Vidha Parishad Candidature)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.