खडसेंचं निश्चित स्वागत करु, बाळासाहेब थोरातांकडून एकनाथ खडसेंना खुली ऑफर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना खुली (Congress Balasaheb Thorats offer to Eknath Khadse) ऑफर दिली आहे.

खडसेंचं निश्चित स्वागत करु, बाळासाहेब थोरातांकडून एकनाथ खडसेंना खुली ऑफर

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना खुली (Congress Balasaheb Thorats offer to Eknath Khadse) ऑफर दिली आहे. “जर एकनाथ खडसे काँग्रेसचा विचार घ्यायला तयार असतील तर त्यांचं निश्चित स्वागत करु” असं बाळासाहेब थोरात म्हणाले. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ऑफर दिल्याचा दावा यापूर्वीच एकनाथ खडसे यांनी केला होता. त्याला आता बाळासाहेब थोरात यांनी दुजोरा दिला.

“एकनाथ खडसे हे एक समर्थ नेते आहेत. त्यांना मी 1990 सालापासून ओळखतो. नाथाभाऊ म्हणाले की मी त्यांना संपर्क केला होता. ते माझे जुने मित्र आहेत. आम्ही 1990 पासून विधानसभेत एकत्र आहोत. खडसे हे जनमानस असलेला नेता आहे. जर काँग्रेसचे विचार स्वीकारुन ते आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु”, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. (Congress Balasaheb Thorats offer to Eknath Khadse)

यापूर्वी खडसेंनी आपल्याला काँग्रेसने विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी ऑफर दिल्याचा दावा केला होता.

एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर (Eknath Khadse claim BJP MLAs cross voting) आली होती. भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी देखील क्रॉस वोटिंग करण्याचे माझ्याकडे मान्य केले होते”, असा गौप्यस्फोट भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने पत्ता कापल्यानंतर एकनाथ खडसे दररोज नवनवे गौप्यस्फोट करत आहेत.

मी काँग्रेसची ऑफर नाकारली
काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी देखील क्रॉस वोटिंग करण्याचे माझ्याकडे मान्य केले होते. परंतु, मी काँग्रेसची ऑफर नाकारत काँग्रेसकडून उभं राहण्यास नकार दिला, असा दावा एकनाथ खडसेंनी केला.

विधानसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषदेचंही तिकीट नाकारलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांशी चर्चा करुन खडसे पुढील राजकीय वाटचाल ठरवण्याची चिन्हं आहेत.

(Congress Balasaheb Thorats offer to Eknath Khadse)

संबंधित बातम्या  

खडसेंचा गौप्यस्फोट, “काँग्रेसकडून सहाव्या जागेची ऑफर होती, भाजप आमदारही क्रॉस वोटिंग करणार होते”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *