MLC Polls : ‘मोदी गो बॅक’ म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले

विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Eknath Khadse on BJP after MLC Poll Candidature Denied)

MLC Polls : 'मोदी गो बॅक' म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले
Follow us
| Updated on: May 08, 2020 | 1:30 PM

जळगाव : विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक असतानाही उमेदवारी डावलल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  खवळले आहेत. ‘मोदी गो बॅक’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्याला विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाते, असा शब्दात एकनाथ खडसेंनी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. (Eknath Khadse on BJP after MLC Poll Candidature Denied)

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांच्या नावावर फुली मारली. एकनाथ खडसे यांनी विधानसभेला तिकीट नाकारल्याबद्दल मनातील खदखद डिसेंबर महिन्यात गोपीनाथगडावरुन जाहीर बोलून दाखवली होती.

“तिघांची नावे शिफारस करुन पाठवण्यात आली होती. तिघांची नावे डावलून नवीन लोकांना संधी देण्यात आली”, अशी खदखद खडसेंनी ‘टीव्ही9 मराठी’कडे बोलून दाखवली.

हेही वाचा : मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंच्या नावावर फुली, भाजपचे चार उमेदवार जाहीर

“गोपीचंद पडळकर यांनी काही दिवस आधी मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकून ‘गो बॅक मोदी’ असा नारा लगावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्याला विधानपरिषदेवर संधी दिली जाते. पण आम्ही चाळीस वर्षे निष्ठेने काम केले. भारतीय जनता पार्टी कोणत्या दिशेने चालली, यावर चिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.

भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार कोण?

लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले होते. तर गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढली होती. बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. या दोघांना भाजपने विधानपरिषदेला संधी देण्याचं ठरवलं आहे. याशिवाय नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष असलेले नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपचे उत्सुक चेहरे कोण होते?

पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याचं खुद्द एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधानपरिषदेवर मला घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. याबाबत मी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असं खडसे म्हणाले होते. (Eknath Khadse on BJP after MLC Poll Candidature Denied)

हेही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत आणा, एकनाथ खडसे विधानपरिषदेसाठी इच्छुक

विधानसभेला संधी न मिळालेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची नावं चर्चेत होती. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

कोणत्या जागांसाठी निवडणूक

24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.

प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची बेगमी आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे. भाजपला तीन जागा सहज जिंकणे शक्य आहे. अपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे.

(Eknath Khadse on BJP after MLC Poll Candidature Denied)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.