Chandrakant Patil Exclusive | विधानसभेनंतर लगेच विधानपरिषद तिकीट दिलं नसेल, पंकजा मुंडे मॅच्युअर्ड : चंद्रकांत पाटील

मी स्वत: पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासाठी प्रयत्नशील होतो, असं चंद्रकांतदादा म्हणाले. (Chandrakant Patil Exclusive Interview Why Pankaja Munde did not get Vidhan Parishad Candidature)

Chandrakant Patil Exclusive | विधानसभेनंतर लगेच विधानपरिषद तिकीट दिलं नसेल, पंकजा मुंडे मॅच्युअर्ड : चंद्रकांत पाटील

मुंबई : विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर परत विधानपरिषद तिकीट दिलं जात नाही, त्यामुळे कदाचित पंकजा मुंडे यांना केंद्राने तिकीट दिलं नसावं, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दिग्गज नेत्यांना विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्याच्या कारणांवर चंद्रकांत पाटलांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बातचित केली. (Chandrakant Patil Exclusive Interview Why Pankaja Munde did not get Vidhan Parishad Candidature)

पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये पराभव झाला. विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर परत विधानपरिषदेला तिकीट दिलं जात नाही. त्यामुळे कदाचित पंकजा मुंडे यांना केंद्राने उमेदवारी दिली नसावी. मी स्वत: पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासाठी प्रयत्नशील होतो, असं चंद्रकांतदादा म्हणाले.

पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत वाढलेल्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्यामध्ये नाराजी असू शकते, पण पंकजाताई खूप मॅच्युअर आहेत. त्यांना खूप मोठं करिअर आहे. त्या चुकीचा निर्णय घेत नाहीत. त्या स्वत: स्वत:ला समजावतील, असा पुनरुच्चार चंद्रकांत पाटील यांनी केला.

कोरोनातून सूट मिळाली तर सर्वांची भेट घेईन, पंकजाताई तर मुंबईतच आहेत, त्यांच्याशी फोनवरुन बोलेन, असं पाटील म्हणाले.

हेही वाचा : खडसेंचं निश्चित स्वागत करु, बाळासाहेब थोरातांकडून एकनाथ खडसेंना खुली ऑफर

ज्यांचं तिकीट नाकारलं त्यांचं मेरिट नव्हतं का? असा प्रश्न विचारला असता, राज्य चालवताना जातीचा, अन्याय झाला का, किंवा राजकीय परिस्थिती याचा आढावा घ्यावा लागतो, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

(Chandrakant Patil Exclusive Interview Why Pankaja Munde did not get Vidhan Parishad Candidature)

मी आणि फडणवीस दोघेही हैराण

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत नेमकं काय झालं हे कळलंच नाही. त्यांना तिकीट का नाकारलं, याबद्दल मी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही हैराण असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

ज्या सहा जणांना फॉर्मची तयारी करण्यासाठी सांगितलं होतं, त्यांना हमी दिली नव्हती, फक्त तयारी करायला सांगितलं होतं, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं. रमेश कराड यांनी लातूर ग्रामीणमध्ये काम केलं आहे, युतीमुळे त्यांना तिकीट मिळालं नव्हतं, तो अन्याय यावेळी भरुन काढला, अशी माहिती पाटील यांनी दिली.

काँग्रेसम आणि भाजप हायकमांडमध्ये फरक

काँग्रेसमधील हायकमांड आणि भाजपमधील हायकमांड यांच्यामध्ये फरक आहे. काँग्रेसमध्ये जवळच्या माणसांचे निर्णय ऐकले जातात. आमच्याकडे मेरिटनुसार निर्णय होतात. काँग्रेसने छातीवर हात ठेवून सांगावं, की निवडलेला उमेदवार पक्षउपयोगी आहे, असं आव्हानही चंद्रकांत पाटलांनी दिलं.

खडसेंना आणि काय हवं?

नाथाभाऊंना 7 वेळा आमदारकी, सुनेला खासदारकी दिली, मुलीला तिकीट दिलं. केंद्राकडे आम्ही पाठपुरावा केला, नाथाभाऊंवर खुन्नस काढण्याचा हेतू नाही, अशा शब्दात एकनाथ खडसेंना आणि काय हवं? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

कारवाई करणं ही आमची कार्यपद्धती नाही, हाताला जखम झाली, तर हात नाही काढत, मलम लावता, पट्टी लावता, इंजक्शन देता, अतिशय वेदना झाल्यानंतर हात कापतात, तेव्हा आनंद होत नाही, त्यामुळे नाथाभाऊ शंभरवेळा बोलले तर आम्ही कारवाई करणार नाही, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.

पहा व्हिडीओ :

(Chandrakant Patil Exclusive Interview Why Pankaja Munde did not get Vidhan Parishad Candidature)

Published On - 4:03 pm, Wed, 13 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI