SBI च्या ‘या’ चार सेवा डिसेंबरपासून बंद

नवी दिल्ली : जर तुमचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या 1 डिसेंबरपासून एसबीआयच्या चार महत्वाच्या सेवा बंद होणार आहेत. 1. नेट बँकिंग : जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला नसेल तर तुमची इंटरनेट बँकिंग सेवा बंद होऊ शकते. याबाबत नेहमीच बँकेकडून …

SBI च्या ‘या’ चार सेवा डिसेंबरपासून बंद

नवी दिल्ली : जर तुमचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या 1 डिसेंबरपासून एसबीआयच्या चार महत्वाच्या सेवा बंद होणार आहेत.

1. नेट बँकिंग :

जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला नसेल तर तुमची इंटरनेट बँकिंग सेवा बंद होऊ शकते. याबाबत नेहमीच बँकेकडून ग्राहकांना मेसेजही पाठविला जातो. ज्याग्रहकांनी अद्यापही आपला मोबाईल नंबर बँकेशी लिंक केलेला नाही त्यांनी येत्या दोन दिवसांत तो करून घ्यावा अन्यथा तुम्ही यापुढे नेट बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही.

2. SBI Buddy होणार बंद :

एसबीआय आपलं मोबाईल वॉलेट SBI Buddy 1 डिसेबरपासून बंद करणार आहे. बँकेनुसार ही सेवा आधीच बंद करण्यात आलेली आहे. पण ज्या ग्राहकांचे पैसे या वॉलेट मध्ये आहेत ते परत कसे मिळवता येईल याबाबत एसबीआयने अद्याप काही माहिती दिलेली नाही.

3. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची संधी :

तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कुणी निवृत्त असेल आणि त्यांची पेंशन एसबीआयच्या कुठल्या शाखेत येत असेल तर 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचं जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. बँकेने यासंबंधीची माहिती सर्व पेंशन धारकांना पोहोचवली आहे. त्यांना 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत आपलं जीवन प्रमाणपत्र बँकेत सादर करायचं आहे. असे न केल्यास त्यांची पेंशन थांबवल्या जाऊ शकते.

4. पेंशन लोन सेवा होणार बंद :

एसबीआयतर्फे पेंशन धारकांना सणासुदीला लोन देण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती. ही सेवा त्याच ग्राहकांसाठी होती ज्यांची पेंशन एसबीआयच्या शाखेत येत असेल. या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रोसेसिंग शुल्काशिवाय लोन दिले जात होते. 79 वर्षांपेक्षा कमी वय असलेले केंद्रीय, राजकीय आणि सैन्यातून निवृत्त झालेल्या पेंशन धारकांनांसाठी या योजनेची सुरवात करण्यात आली होती, जी आता 30 नोव्हेंबरला बंद होणार आहे.

त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांत आपली एसबीआयची सर्व कामे आटपून घ्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *