मुंबई पुणे एक्सप्रेस वे दोन तासांसाठी बंद

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (23 ऑक्टोबर) दोन तासांचा ब्लॉक (Mumbai pune expressway) घेण्यात येणार आहे.

Mumbai pune expressway, मुंबई पुणे एक्सप्रेस वे दोन तासांसाठी बंद

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (23 ऑक्टोबर) दोन तासांचा ब्लॉक (Mumbai pune expressway) घेण्यात येणार आहे. ओव्हरग्रेड ग्रँन्ट्री बसवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील ब्लॉक दरम्यान सर्व प्रकारची अवजड वाहतूक खालापूर आणि कुसगाव टोलनाक्याजवळ थांबवण्यात येणार आहे. तर चारचाकी आणि इतर प्रवाशी वाहने ही कुसगाव टोलनाक्याहून जुन्या मुंबई पुणे महामार्गाद्वारे पुण्याकडे वळवण्यात येणार (Mumbai pune expressway) आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या या ब्लॉक दरम्यान मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे. तसेच कामावरुन परतणाऱ्या चाकरमान्यांना या ब्लॉकचा त्रास होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही मुंबई पुणे एक्सप्रेस वे दरम्यान अनेकदा ओव्हरग्रेड ग्रँन्टी बसवण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *