राष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोना, कुटुंबातील चौघांना संसर्ग

नाशिकच्या एका आमदाराची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. (Nashik MLA corona test Positive) 

राष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोना, कुटुंबातील चौघांना संसर्ग

नाशिक : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, (Nashik MLA corona test Positive) अनेक राजकीय नेते, मंत्रीही कोरोनाच्या कचाट्यात येत आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. जितेंद्र आव्हाडांनी कोरोनावर मात केली आहे, तर अशोक चव्हाण यांच्यावर उपचार सुरु आहेत. यानंतर आता नाशिकच्या एका आमदाराची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. (Nashik MLA corona test Positive)

आमदारांसह त्यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आमदाराच्या कुटुंबातील काहीजण मुंबईला नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. बहीण आणि मुलगी यांचा कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील आमदारांचा अहवालही गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने, आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. आमदारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कालपर्यंत 1074 वर पोहोचली. मालेगावात सर्वाधिक रुग्ण आहेत. नाशिक शहरात गुरुवारी दिवसभरात 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यामुळे शहराची रुग्णसंख्या 152 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या

राज्यात काल दिवसभरात तब्बल 2 हजार 598 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59 हजार 546 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 85 कोरोना (Maharashtra Corona Cases) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या 1 हजार 982 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात (Maharashtra Corona Cases) आला आहे.

(Nashik MLA corona test Positive)

अशोक चव्हाण यांना कोरोना

दरम्यान, काही दिवसापूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. अशोक चव्हाण यांना उपचारासाठी नांदेडवरुन मुंबईत आणलं आहे. मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या 

किमान 12 तास रस्तेमार्गे प्रवास, अशोक चव्हाणांवर मुंबईत कोरोनावर उपचार!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *