शाळेतून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण, लैंगिक अत्याचारानंतर गळा आवळून खून

लैंगिक अत्याचारासाठी एका 7 वर्षीय चिमुकलीचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे (Physical Abuse and Murder of girl). आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यावर तिचा गळा आवळून खूनही केला आहे.

Physical Abuse and Murder of girl, शाळेतून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण, लैंगिक अत्याचारानंतर गळा आवळून खून

यवतमाळ : लैंगिक अत्याचारासाठी एका 7 वर्षीय चिमुकलीचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे (Physical Abuse and Murder of girl). आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यावर तिचा गळा आवळून खूनही केला आहे. या प्रकरणी कुटुंबियांच्या तक्रारीवरुन यवतमाळ पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहेत. पोलिसांनी संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पीडित मुलगी उमरखेड तालुक्यातील एका शाळेतून 12 मार्चला बेपत्ता झाली होती. सायकलने शाळेत गेलेली ही चिमुरडी शाळा संपूनही परत न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती कोठेही सापडली नाही. अखेर पालकांनी पोफाळी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 9 पथकांकडून विद्यार्थिनीचा शोध घेण्यात आला.

दरम्यान 8 दिवसांनंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित आरोपी या मुलीला मोटारसायकलवरुन घेऊन जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या गजानन बोरके याने आपण या मुलीचं अपहरण करुन खून केल्याची कबुली दिली.

आरोपी गजानन पीडित मुलीच्या नातेवाईकांपैकी एक आहे. तो पीडित मुलीच्या शाळेमागेच राहत होता. याच ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला मोटारसायकलवर बसवून नेलं. त्यानंतर पुसद मार्गावरील शिळोणा घाटात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी नराधम आरोपी गजानन बोरके याला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान पीडितेच्या संतप्त नातेवाईकांनी उमरखेड पुसद मार्गावर रास्तारोको आंदोलन करुन आरोपीला नागरिकांच्या ताब्यात देण्याची मागणी केली.

संबंधित बातम्या :

वसईत कोरोनाच्या नावावर औषध विक्री, 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

एअर हॉस्टेस होण्याची इच्छा अर्धवट, डोंबिवलीत मोबाईल चोर तरुणी अटकेत

वडिलांकडून मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, पीडिता 4 महिन्यांची गर्भवती

शिक्षकी पेशाला काळिमा, प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींवर अत्याचार, तक्रारीनंतर अटक

संबंधित व्हिडीओ :


Physical Abuse and Murder of girl

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *