वडिलांकडून मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, पीडिता 4 महिन्यांची गर्भवती

जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वडिलांनी मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Physical abuse of daughters friend).

वडिलांकडून मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, पीडिता 4 महिन्यांची गर्भवती

चंद्रपूर : जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वडिलांनी मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Physical abuse of daughters friend). पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. योगेश दोहतरे असं आरोपीचं नाव आहे.

आरोपीने योगेश दोहतरेच्या घरी त्याच्या मुलीची 12 वर्षीय मैत्रीण यायची. आरोपीची तिच्यावर वाईट नजर होती. ती घरी आल्यानंतर तो तिच्याशी लगट करायचा. तसेच याबद्दल कुणाला सांगितलं तर जीवानिशी ठार मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळं भीतीने पीडित मुलीने याची माहिती कुटुंबियांनाही दिली नाही. याचा फायदा उचलत आरोपीने तिच्यावर वारंवर लैंगिक अत्याचार केले.

पीडित अल्पवयीन मुलीनं दोन दिवसांपूर्वी मुलीचं पोट दुखत असल्याचं आईला सांगितलं. त्यानंतर आईने तिला डॉक्टरांकडे नेलं. तपासात पीडिता 4 महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. याने आईला धक्का बसला. चौकशी केली असता अखेर मुलीने आई-वडिलांना सर्व हकीकत सांगितली. पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी योगेश दोहतरे याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

शिक्षकी पेशाला काळिमा, प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींवर अत्याचार, तक्रारीनंतर अटक

भाडेकरुच्या पत्नीशी समलिंगी संबंध, घरमालकीणीने नवऱ्याला संपवलं

अल्पवयीन तरुणाला शारीरिक संबंधांसाठी बळजबरी, विवाहितेवर गुन्हा

बेडरुममध्ये प्रियकर-प्रेयसी, अचानक आई आल्याने तरुणीची खिडकीतून खाली उडी

पोलिसासह तिघांचा विधवेवर बलात्कार, तिघांना अटक

संबंधित व्हिडीओ:


Physical abuse of daughters friend

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *