ससूनच्या ऑक्सिजन पाईपलाईनचं 6 महिन्यांचं काम 11 दिवसात पूर्ण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘जागतिक विक्रम’

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीत मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम विक्रमी अवघ्या 11 दिवसांमध्ये पूर्ण केलं आहे (Sasoon hospital work by PWD in world record time).

ससूनच्या ऑक्सिजन पाईपलाईनचं 6 महिन्यांचं काम 11 दिवसात पूर्ण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा 'जागतिक विक्रम'
Follow us
| Updated on: Apr 12, 2020 | 10:17 PM

पुणे : राज्यभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात मुंबई आणि पुणे येथे कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचमुळे अशा काळात राज्यातील रुग्णालयं यासाठी सज्ज असणं आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीत मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम विक्रमी अवघ्या 11 दिवसांमध्ये पूर्ण केलं आहे (Sasoon hospital work by PWD in world record time). स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याची माहिती दिली आणि विभागाच्या या विक्रमी कामाबद्दल अभिनंदन केलं.

अशोक चव्हाण म्हणाले, “ससून रुग्णालयाची 11 मजली इमारत बांधून जवळपास तयार होती. कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर या इमारतीत अतिदक्षता व विलगीकरण कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम बाकी होतं. हे काम ‘हाफकीन’कडून केलं जातं. मात्र कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे त्यांच्यावरही कामाचा प्रचंड ताण असल्याने या कामाला वेळ लागणार होता. अखेर ससून रुग्णालयाच्या इमारतीत मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचं हे मोठं आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आलं.

सार्वजनिक बांधकाम विभागाने कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील ससून रुग्णालयाचं हे आव्हान स्वीकारत हे काम अवघ्या 11 दिवसांमध्ये यशस्वीपणे पूर्ण केलं. सामान्यतः अशा कामांची निविदा काढण्यापासून ते प्रत्यक्ष कामाची पूर्तता होण्यासाठी 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयातील मेडिकल गॅस पाईपलाईनचे काम तातडीने व युद्धपातळीवर करण्याची नितांत आवश्यकता होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने रात्रंदिवस काम केलं आणि हे काम पूर्ण केलं, असंही अशोक चव्हाण यांनी नमूद केलं.

द्रवरूपी ऑक्सिजन वायूत रुपांतर करुन पुरवठा करण्याचं काम इतक्या कमी वेळेत पूर्ण करण्याचा हा जागतिक विक्रम असल्याचं अॅटलास कॉप्को या बहुराष्ट्रीय कंपनीने म्हटले आहे. अॅटलास कॉप्को कंपनीने या कामासाठी संबंधित कंत्राटदाराला मदत केली आहे.

या कामासोबतच ऑपरेशन थिएटर आणि नजिकच्या इन्फोसिस इमारतीत तळमजल्यावर आयसीयू कक्ष व मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत कोरोना लॅब उभारण्याचे कामही पूर्ण करण्यात आले. ससूनच्या नव्या इमारतीत तळमजला, चौथा, पाचवा, सहावा, सातवा मजला पूर्ण झाला आहे. 10 एप्रिल रोजी येथे काम हस्तांतरीत करण्यात आलं आहे. याठिकाणी 50 खाटांचे आयसीयू कक्ष आणि 100 खाटांचा विलगीकरण वॉर्ड रविवारी सायंकाळपासून औपचारिकपणे रुग्णसेवेला प्रारंभ करणार आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. हे काम विक्रमी वेगाने पूर्ण केल्याबद्दल त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सर्व संबंधितांचीही प्रशंसा केली.

संबंधित बातम्या :

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1982, नव्या 221 रुग्णांची नोंद

कोरोनाचा कहर, देशात 24 तासात 909 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 8,356 वर

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

भारतात ‘कोरोना’ग्रस्त तुलनेने कमी, मात्र फैलाव दर वाढता, ‘कोरोना’ कसा पसरतोय?

‘जी दक्षिण’मध्ये अडीचशे कोरोनाग्रस्त, मुंबईची वॉर्डनिहाय ‘कोरोना’ रुग्णसंख्या

Sasoon hospital work by PWD in world record time

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.