...तरच 14 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊन निर्बंधांवर पुनर्विचार : राजेश टोपे

देशभरात कोरोना नियंत्रणासाठीचा लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर बंद होणार की त्याचा कालावधी वाढणार का यावर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Rajesh Tope on Lockdown extension amid Corona).

...तरच 14 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊन निर्बंधांवर पुनर्विचार : राजेश टोपे

मुंबई : देशभरात कोरोना नियंत्रणासाठीचा लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर बंद होणार की त्याचा कालावधी वाढणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता यावर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Rajesh Tope on Lockdown extension amid Corona). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी केलेल्या संवादामध्ये त्यांनी स्वतः 14 एप्रिलनंतर राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनच्या निर्बंधांवर पुनर्विचार सुरु असल्याचं सांगितलं. मात्र, 14 एप्रिलनंतर निर्बंध कमी करायची नाही हे सर्व नागरिकांच्या शिस्त पाळण्यावरच अवलंबून असणार आहे, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

राजेश टोपे म्हणाले, “सोशल डिस्टन्सिंग राखा, घरी थांबा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आज आपण लॉकडाऊन केला आहे. आपण 100 टक्के ते पाळतो देखील आहे. परंतू आपल्याला 14 एप्रिलनंतर काय असं वाटत आहे. आत्ताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिलनंतर टप्प्या-टप्प्याने यात काही ढिलाई देता येईल का याबाबतचा विचार सुरु असल्याची माहिती दिली. परंतू आपण शिस्त पाळली तरच हे सर्व करता येईल.”

राज्यातील जे काही कंटेनमेंट झोन आहेत त्या सर्व क्षेत्रात पार कठोरपणे आपल्याला गर्दी रोखावी लागेल. अन्यथा संख्या अशीच वाढत राहिली तर आपल्या महाराष्ट्रासाठी ते योग्य राहणार नाही. म्हणूनच आपल्याला स्वयंशिस्त पाळायची आहे. मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार, मीच माझा रक्षक, या विचाराने आपल्याला कटीबद्ध राहून काम करावं लागेल, अशीच माझी या निमित्ताने विनंती आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

“आपल्याकडे संसाधनं कमी आहेत असं काही  लोकांना वाटतं. आपल्याकडे पीपीईच्या 25 हजार कीट उपलब्ध आहेत. अडीच लाखापेक्षा जास्त एन 95 मास्क आहेत. 25 लाखापेक्षा जास्त इतर मास्क आहेत. सरकारी रुग्णालयात दीड हजार व्हेंटिलेटर आणि खासगी रुग्णालयात 1 हजार व्हेंटिलेटर महाराष्ट्रात आहेत. लवकरच नवीन दोन हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होत आहेत. प्रत्येकाने एन 95 आणि पीपीईचा आग्रह धरणं अयोग्य आहे. ते फक्त कोरोना उपचार करणाऱ्यांसाठी वापरले जाणार असल्याचा प्रोटोकॉल आहे. ज्यांना काही लक्षणे आढळतात त्यांनी कोविड रुग्णालयात जावे. डॉक्टर मंडळींनी क्लिनिक बंद ठेवणं मला योग्य वाटत नाही. त्यांना आम्ही विनंती केली आहे.”

राजेश टोपे म्हणाले, “रोग प्रतिकार शक्ती वाढवणे आवश्यक आहे. आपण आवळा, मोसंबी, संत्रा आणि लिंबूचे अधिक सेवन करा. कोमट पाणी घ्या. योग्य पद्धतीचा आहार आणि व्यायाम करा. योगा करणेही गरजेचे आहे. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही 250 डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. लवकरच तेही कोरोना नियंत्रणाच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडतील. सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे.”

संबंधित बातम्या :
सोलापूरच्या चिमुकलीकडून वाढदिवसाचा निधी, शाहरुखकडून जागा, ताजकडून हॉटेल, आपण लढाई जिंकणार : मुख्यमंत्री

आतापर्यंत हात जोडलेत, फेक व्हिडीओने महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, अन्यथा… : मुख्यमंत्री

नवी मुंबई एपीएमसीची समिती स्थापन, अखेर द्राक्षांची निर्यात सुरु, तीन दिवसात हजारो टन द्राक्षे युरोपला निर्यात

दादरमध्येही कोरोनाचा शिरकाव, शिवाजी पार्क परिसरात कोरोनाचा रुग्ण

उपचार काय करताय, मरकजवाल्यांना गोळ्या घाला : राज ठाकरे

Rajesh Tope on Lockdown extension amid Corona

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *