तुषार गांधी आणि अन्वर राजन यांचे पुण्यातील भाषण अचानक रद्द, कुमार सप्तर्षींकडून निषेध

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात निमंत्रित करण्यात (Tushar gandhi and Anvar Rajan) आले होते.

Tushar gandhi and Anvar Rajan, तुषार गांधी आणि अन्वर राजन यांचे पुण्यातील भाषण अचानक रद्द, कुमार सप्तर्षींकडून निषेध

पुणे : महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात निमंत्रित करण्यात (Tushar gandhi and Anvar Rajan) आले होते. पण ऐनवेळी हा कार्यक्रम तसेच त्यांचे भाषण रद्द करण्यात आले आहे. महाविद्यालयात धमकीचे पत्र आल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती (Tushar gandhi and Anvar Rajan) आहे.

पुण्यातील मॉडर्न महिविद्यालयात जन्मशताब्दी निमित्ताने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तुषार गांधी आणि पुणे गांधी भवनचे अन्वर राजन यांना बोलवण्यात आले होते. हिंदुत्ववादी संघटनेच्या दबावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असा आरोप अन्वर राजन यांनी केला आहे.

तुषार गांधी यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. “गोली मारो गँग इन अॅक्शन, बापूजींच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील कार्यक्रमासाठी मला बोलवण्यात आले होते. पण आज सकाळी कार्यक्रम रद्द झाल्याचा दूरध्वनी आला”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पुण्यातील चर्चासत्राचा कार्यक्रम रद्द झाल्याने सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी पत्रकाद्वारे या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

“माझे तुषार गांधी यांच्याशी काल रात्री अकरा वाजता बोलणे झाले आहे. त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम मी पुढील पंधरा दिवसात आमच्या कॉलेजमध्ये ठेवणार आहे. आमचा गांधींना विरोध नाही. महात्मा गांधी हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये”, असं स्पष्टीकरण प्रॉग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी दिल.

“तुषार गांधी यांच्या भाषणाचे काही व्हिडीओ विद्यार्थ्यांनी आम्हाला दाखवले. ते व्हिडीओ आक्षेपार्ह आहेत असं त्या विद्यार्थ्यांचे मत होतं. त्यामुळे तुषार गांधी कार्यक्रमाला आल्यास आम्ही निदर्शनं करू असा इशारा त्या विद्यार्थ्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर कॉलेजमध्ये परीक्षा सुरू असताना कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच शांततेचा भंग होऊ नये यासाठी तुषार गांधी यांना दिलेले निमंत्रण रद्द केले”, असंही एकबोटेंनी सांगितले.

“तथापि ही कार्यशाळा ठरल्याप्रमाणे होत आहे. फक्त तुषार गांधी यांचा त्यात सहभाग नसेल. आम्ही त्यांना नंतर स्वखर्चाने बोलवणार आहोत”, अस एकबोटे म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *