LIVE : मला कोथरुडकर बाहेरचा म्हणणार नाहीत : चंद्रकांत पाटील

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, एकाच ठिकाणी

LIVE : मला कोथरुडकर बाहेरचा म्हणणार नाहीत : चंद्रकांत पाटील
Picture

मला कोथरूडकर बाहेरचा म्हणणार नाहीत : चंद्रकांत पाटील

#कोल्हापूर : सात तारखेला राज्यातील सगळे बंडोबा थंड होतील. कोथरूड जितकं मला माहित आहे, तितकं कोणालाच माहीत नाही, मला कोथरूडकर बाहेरचा म्हणणार नाहीत. युतीचा फॉर्म्युला लोकांना कळण्याची गरज नाही. युती झाली हे पुरेसं – चंद्रकांत पाटील

01/10/2019,11:37AM
Picture

मित्रपक्षांनी कमळ चिन्हावर लढण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही

महायुतीत मित्र पक्षांनी भाजपचं चिन्ह कमळावर लढावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेत्यांकडे आग्रही मागणी. जागावाटपात मित्रपक्षांना 12 ते 18 जागा सोडल्या जाण्याची शक्यता.

01/10/2019,11:13AM
Picture

गुहागरमधून भास्कर जाधवांना उमेदवारी, भाजपचे पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारी

रत्नागिरी – भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांना युतीची उमेदवारी जाहीर केल्यामुळे गुहागरमधील भाजपचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत. डॉ विनय नातू यांच्या उपस्थितीत उद्याच्या कोअर कमिटीची बैठक होणार, बैठकीनंतर भाजप कार्यकर्ते ठरवणार पुढची दिशा, भाजप कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गुहागरमध्ये बंडखोरीची मोठी शक्यता, भाजपचे गुहागरमधील माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही जागा भाजपला मिळावी अशी केली होती मागणी.

01/10/2019,10:16AM
Picture

अरुण गवळीच्या मुलीचा भायखळा विधानसभेसाठी अर्ज

डॉन अरुण गवळी यांची मुलगी नगरसेविका गीता गवळी भायखळा विधानसभेसाठी अर्ज भरणार, मुंबई महापालिकेत गीता गवळी या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आहेत. पालिकेत गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजप कोट्यातून त्या स्थायी समिती सदस्य सुद्धा आहेत. पण भायखळा विधानसभेसाठी युतीकडून सेनेच्या यामिनी जाधव निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पालिकेत पाठिंबा दिलेल्या गीता गवळींना भाजप पाठिंबा देतं की युतीचा धर्म पाळतो हे पाहावे लागणार आहे.

01/10/2019,10:08AM
Picture

जयदत्त क्षीरसागर यांची डोकेदुखी वाढली

बीड: शिवसेनेतून मंत्रिपद मिळवलेले जयदत्त क्षीरसागर यांची डोकेदुखी वाढली. शिवसेनेचा एक गट नाराज, प्रा. शिवराज बांगर बंडखोरी करणार, बंडखोरी रोखण्याचे क्षीरसागरांसमोर मोठे आव्हान.

01/10/2019,9:55AM
Picture

नितेश राणे राजीनामा देणार

सिंधुदुर्ग – काँग्रेसचे आमदार नितेश राणे आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार. उद्याच्या भाजप प्रवेशाबाबत मात्र अजून संभ्रम

01/10/2019,10:00AM
Picture

दोन्ही राजेंचं शक्तीप्रदर्शन

सातारा – दोन्ही राजे आज अर्ज भरणार, शिवेंद्रसिंहराजे यांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात, १० वाजता शिवेंद्रसिंहराजेंच्या रोड शोला सुरुवात होणार आहे, दोन्ही राजेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार

01/10/2019,9:59AM
Picture

वसईत हितेंद्र ठाकूर अर्ज भरणार

वसई : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आज उमेदवारी अर्ज भरणार, नरवीर चिमाजी अप्पा मैदान ते तहसील कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करत ठाकूर आपला अर्ज भरणार. सकाळी 11 वाजत चिमाजी अप्पा मैदानापासून हितेंद्र ठाकूर यांची रॅली निघणार आहे. हितेंद्र ठाकूरांच्या शक्तीप्रदर्शनाकडे वसईकारांचे लक्ष

01/10/2019,9:59AM
Picture

नाशिकमधील इच्छुकांची मुंबईत फिल्डिंग

नाशिक – पूर्व विधानसभा मतदासरसंघासाठी इच्छुक उमेदवारांची मुंबईत फिल्डिंग, रात्री उशिरापर्यंत इच्छुकांचं गिरीश महाजनांच्या बंगल्यावर शक्ती प्रदर्शन, पूर्व विधानसभा जागेवरून भाजपात काथ्याकूट सुरूच

01/10/2019,9:59AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *