VIDEO : उन्हाने त्रस्त माया वाघिणीचा बछड्यांसोबत जलविहार

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जगप्रसिद्ध माया वाघिणीचा बछड्यांसह जलविहार पाहायला मिळत आहे. उन्हाने त्रस्त झाल्याने ही वाघिण आपल्या बछड्यांसह तलावात मस्ती करताना दिसली. ताडोबातील या मनोहारी दृष्याने देश विदेशातील पर्यटकांना आनंद झाला. ताडोबातील एका तलावातील पाण्यात माया वाघीण आपल्या 2 बछड्यांसह अंघोळ करताना मस्ती करत असल्याचे दिसले. हिमांशू बागडे या नागपूरकर वन्यजीव अभ्यासकांनी हे …

VIDEO : उन्हाने त्रस्त माया वाघिणीचा बछड्यांसोबत जलविहार

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जगप्रसिद्ध माया वाघिणीचा बछड्यांसह जलविहार पाहायला मिळत आहे. उन्हाने त्रस्त झाल्याने ही वाघिण आपल्या बछड्यांसह तलावात मस्ती करताना दिसली. ताडोबातील या मनोहारी दृष्याने देश विदेशातील पर्यटकांना आनंद झाला.

ताडोबातील एका तलावातील पाण्यात माया वाघीण आपल्या 2 बछड्यांसह अंघोळ करताना मस्ती करत असल्याचे दिसले. हिमांशू बागडे या नागपूरकर वन्यजीव अभ्यासकांनी हे दृश्य कॅमेरामध्ये कैद केले. या अविस्मरणीय दृष्याने पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणजे जगभरातील व्याघ्र प्रेमींसाठी आकर्षण स्थळ. ताडोबा प्रकल्पात वाघ, बिबट्यासह अन्य वन्यजीवांचे नंदनवन आहे. येथे वाघांसह इतर वन्यजीवांचे दर्शन हमखास होते. त्यामुळे देश आणि विदेशातील हौशी पर्यटकांची ताडोबात गर्दी असते.

माया वाघिणीला पोस्टाच्या तिकिटावरही स्थान

या प्रकल्पातील माया वाघीण तर आता जगभरात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या वाघिणीने पर्यटकांना अनेकदा आपले मायाळू रुप दाखवले आहे. ताडोबातील या माया वाघिणीला पोस्टाच्या तिकिटावरही स्थान मिळाले आहे. त्यामुळे पर्यटकांना या वाघिणीचे नेहमीच आकर्षण राहते. कधी माया वाघिणीचे आपल्या बछड्यासह मस्ती करतानाचे तर कधी बछड्यांना भरावतानाचे दृश्य पर्यटकांनी आजवर अनुभवले आहे. आता याच माया वाघिणीच्या आणखी एका मायाळू आणि मस्तीखोर रुपाने पर्यटक चांगलेच खुश झाले आहेत.

जगातील सर्वाधिक 48 अंश तापमानाची नोंद चंद्रपुरात

सध्या चंद्रपूरचे तापमान कमालीच वाढत आहे. अलीकडेच जगातील सर्वाधिक 48 अंश इतक्या तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली. या तापमानामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. चंद्रपूरचे तापमान अंगाची लाहीलाही करणारे आहे. नागरिकांसह वन्यजीव देखील वाढत्या तापमानामुळे भाजून निघत आहेत. त्यामुळेच माया वाघीण आपल्या 2 बछड्यांसह तलावात पोहचली. यावेळी तिने आपल्या बछड्यांसह मनसोक्त मस्ती देखील केली.

माया वाघिणीची पाण्यातील बछड्यासोबतची ही मस्ती बराच वेळपर्यंत चालली. पर्यटकांनीही हा अविस्मरणीय क्षण डोळ्यात साठवून घेतला. नागपूरच्या हिमांशू बागडे या वन्यजीव अभ्यासकांनी तर हा प्रसंग थेट आपल्या कॅमेरात कैद केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *