AIIMS च्या डॉक्टरांना मोठं यश; मधुमेहावर गुणकारी औषधोपचार शोधल्याचा दावा

| Updated on: Jan 29, 2021 | 3:50 PM

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्लीच्या डॉक्टरांनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक नवीन उपचार पद्धती शोधल्याचा दावा केला आहे. Aims Delhi medicine diabetes

AIIMS च्या डॉक्टरांना मोठं यश; मधुमेहावर गुणकारी औषधोपचार शोधल्याचा दावा
कोरोनाची चार नवी लक्षणे
Follow us on

नवी दिल्ली: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्लीच्या डॉक्टरांनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक नवीन उपचार पद्धती शोधल्याचा दावा केला आहे. मधुमेह आणि कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवीन पद्धतीचा अभ्यास करण्यात आला. एम्सच्या दोन डॉक्टरांच्या टीमनं अ‌ॅलोपॅथी आणि आयुर्वेदातील काही औषधं एकत्रित करुन नवी उपचार पद्धती तयार केली आहे. डॉक्टरांनी केलेल्या दाव्यानुसार मधुमेहाच्या रुग्णांवर कोरोना संसर्ग झाला असताना नव्या उपचार पद्धतीचा फायदा होईल. याशिवाय हृदयविकारासंबंधीच्या तक्रारी देखील कमी होतील.(AIIMS Delhi Doctors made new medicine of diabetes )

एम्सच्या अभ्यासानुसार अ‌ॅलोपॅथीचे एक औषध आणि बीजीआर-34 याचे डोस एकत्रितपणे रुग्णास दिल्यास मधुमेह वेगात कमी होऊ शकतो. याशिवाय यामुळे होणाऱ्या ह्रदयविकाराचं प्रमाण देखील कमी होऊ शकते. ही औषध रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढू देत नसल्याचा दावा, एम्सच्या पथकानं केला आहे. यापूर्वी तेहरान विद्यापीठाच्य तज्ञ देखील अँटी ऑक्सिडंटसच्या वापरासह हर्बल औषधांसह मधुमेहाच्या रुग्णांवरील कोरोना संक्रमण कमी करण्यात फायदेशीर ठरत असल्याचा दावा केला होता. भारताच्या सीएसआयरनं विकसित केलेल्या बीजीआर 34 या अँटीडायबिटीक क्षमतेचा शोध लावण्याचा प्रय्तन एम्सच्या डॉक्टरांनी केला आहे.

तीन टप्प्यात अभ्यास सुरु

एम्सच्या फार्मेकोलॉजी विभागाचे डॉ. के सुधीर चंद्र सारंगी यांच्या नियंत्रणाखाली हा अभ्यास करण्यात येत आहे. हा अभ्यास तीन टप्प्यात सुरु असून पहिला टप्पा दीड वर्षानंतर पूर्ण झाला आहे. या अभ्यासात मिळालेली निरीक्षण उत्साहजनक आहेत. या अभ्यासानुसार बीजीआर-34 आणि अ‌ॅलोपॅथिक औषध ग्लिबेनक्लामीड याचं पहिल्यांदा स्वतंत्रपणे निरीक्षण करण्यात आले. दोन्ही औषधांच्या परिणामांची तुलना केली गेली तेव्हा दोन्ही औषधांचा एकत्रित परिणाम दुप्पट प्रमाणात आढळतो. यामुळे इन्सुलीन वाढून लेप्टिन हार्मोन कमी होत जाते.

विजयसार, दारुहिद्रा, गिलोय, मजीठ, गुडमार, मिथिका आदी जडीबुटींचा वापर करुन लखनऊ येथील सेंट्रल इनस्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड एरोमॅटिक प्लांटस आणि नॅशनल बॉटनिकल रिसर्च इनस्टिट्यटच्या अभ्यसानंतर बीजीआर-34 चा शोध लावण्यात आला होता. डॉक्टरांच्या माहितीनुसार इन्सुलिन वाढल्यानंतर मधुमेह नियंत्रित होतो. लेप्टिन हार्मोन कमी झाल्यानंतर स्थूलता आणि अन्य रोग कमी होतात. मधुमेहाच्या रुग्णांना हे संशोधन फायदेशीर ठरणार आहे.

संबंधित बातम्या:

51 लाख लोकांना लस, 48 सरकारी, 100 खासगी रुग्णालयं सज्ज, केजरीवालांचा लसीकरणाचा मेगाप्लॅन

दिल्लीत कोरोनाच्या नव्या अवताराचे 8 रुग्ण, सरकारने घेतला मोठा निर्णय

(AIIMS Delhi Doctors made new medicine of diabetes)