जगभरात दरवर्षी 9 लाखाहून अधिक लोकांचा अकाली मृत्यू कशामुळे?; अमेरिकन संशोधकांनी केला ‘हा’ दावा

| Updated on: Jul 28, 2021 | 9:46 AM

पेंट आणि कीटकनाशकामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी 9 लाखाहून अधिक लोकांचा अकाली मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. (Air pollution particles from everyday products cause 9 lakh premature deaths every year)

जगभरात दरवर्षी 9 लाखाहून अधिक लोकांचा अकाली मृत्यू कशामुळे?; अमेरिकन संशोधकांनी केला हा दावा
Air pollution
Follow us on

नवी दिल्ली: पेंट आणि कीटकनाशकामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी 9 लाखाहून अधिक लोकांचा अकाली मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अमेरिकेतील कोलोराडो यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही माहिती पुढे आली आहे. (Air pollution particles from everyday products cause 9 lakh premature deaths every year)

पेंट आणि कीटकनाशकाच्या बारिक कणांमुळे वायू प्रदूषण होतं. या कणांमुळे दरवर्षी 3.4 लाख ते 9 लाखापर्यंत लोकांचा अकाली मृत्यू होतो. आम्ही या कारणाने होणाऱ्या मृत्यूचा जेवढ्या आकड्याचा अंदाज लावला होता. त्यापेक्षा मृत्यूचा हा आकडा अधिक पटीने असल्याचं बेंजामिन नॉल्ट या संशोधकाने म्हटलं आहे.

संशोधकांचा सल्ला

यापूर्वी याबाबत संशोधन झालं होतं. त्यात, प्रदूषणाच्या बारिक कणामुळे (पीएम 2.5) दरवर्षी जगात 30 ते 40 लाख मृत्यू होत असल्याचं दिसून आलं होतं. हे संशोधन बाहेर आल्यानंतर अनेक देशांनी आपल्या गाईडलाईनमध्ये बदल केला होता. या कणांसाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आली होती. यात पॉवर प्लांट, डिजल एक्लॉस्ट आणि जीवाश्म इंधनमधून निघणारे सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईडला नियंत्रित करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

केमिकल्सपासून दूर रहा

मात्र, आता नव्या संशोधनात क्लिनिंग आणि पेंटच्या उत्पादनातून निघणाऱ्या ऑर्गेनिक एअरसोलला कंट्रोल करण्यास सांगितलं जात आहे. तुम्ही अशा केमिकल्सवाल्या सोर्सपासून दूर राहिला तर तुम्ही मृत्यूच्या सोर्सपासून दूर आहात असा त्याचा अर्थ होतो, असं बेंजामिन यांनी म्हटलं आहे.

लाकूड, कोळसा जाळणंही हानिकारक

संशोधकांनी गेल्या दोन दशकांपासून उत्सर्जनावर वेगवेगळे 11 संशोधन केले आहेत. बीजिंग, लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये हे संशोधन झालं होतं. त्यात लाकूड, कोळसा जाळणं, घरात केमिकलवाले पेंट लावणं, केमिकलयुक्त उत्पादनांचा अधिक वापर करणं आदी कारणामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचं या संशोधनातून आढळून आलं होतं. यामुळे एअरोसॉल हवेत मिसळतात आणि त्यामुळे शरीराला नुकसान होतं, असं संशोधनात म्हटलं आहे. (Air pollution particles from everyday products cause 9 lakh premature deaths every year)

 

संबंधित बातम्या:

Health Tips : ‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक, तंदुरुस्त राहायचे असेल तर आजच त्यांना निरोप द्या!

Health care : आपल्याला ‘हा’ आजार असेल तर बटाटे खाणे त्वरित थांबवावे, वाचा अधिक!

Corona Cases In India | कोरोना ओसरतोय, नव्या कोरोना केसेस चार महिन्यात पहिल्यांदाच 30 हजाराच्या खाली

(Air pollution particles from everyday products cause 9 lakh premature deaths every year)