Health Care : कुछ मीठा हो जाएं ! जेवणानंतर तुम्हालाही होते गोड खाण्याची क्रेव्हिंग ? हे रोग कधी शरीरात येतील कळणारही नाही..

Sweet After Dinner : रात्रीच्या जेवणानंतर काहीतरी गोड पदार्थ किंवा मिठाई खाण्याची सवय आपल्यापैकी बहुतांश लोकांना असते. ते खाल्ल्यावर बरं वाटतं, समाधानही मिळतं. पण या गोड खाण्याचे काही तोटेही असू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने आपले शरीर अनेक आजारांचे घर बनू शकते.

Health Care : कुछ मीठा हो जाएं ! जेवणानंतर तुम्हालाही होते गोड खाण्याची क्रेव्हिंग ? हे रोग कधी शरीरात येतील कळणारही नाही..
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 4:12 PM

Health Care : दिवसभराचं कामकाज संपवून, थकून-भगून घरी आल्यावर कुटुंबियांसोबत गप्पा मारत जेवण्याची मजा काही औरच असते. पण खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा सगळेच जमलेले असतात आणि जेवणानंतर काही गोड खाण्याची टूम निघते. जेवणानंतर काहीतरी गोड पदार्थ किंवा मिठाई खाण्याची सवय आपल्यापैकी बहुतांश लोकांना असते.मस्त वाटतं त्याने, मनाला थंडक की काय ते मिळते. काही लोकांना तर याची इतकी सवय लागते, की ते त्याचा आहारीच जातात. जेवल्यावर गोड खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाहीत ते, चैनच पडत नाही त्यांना. पण जेवणानंतर विशेषत: रात्रीच्या जेवणानंतर नेहमी गोड खाण्याची ही सवय अनेक रितीने आपल्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री जेवल्यानंतर मिठाई खाल्ल्याने शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते, ज्याबद्दल कदाचित बऱ्याच जणांना माहितही नसेल.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, रात्रीच्या जेवणानंतर गोड खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक आहे. रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराला कसे आणि कोणते नुकसान होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

वजन वाढणं

डॉ. सांगतात की रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. मिठाईमुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर मिठाई खाणे आवर्जून टाळा. तसेच जेवण आणि झोप यात कमीत कमी २ तासांचे अंतर ठेवा. जेव्लायवर लगेच झोप नका, थोड शतपावली करा. नाहीतर गॅसेसचा त्रास होऊ शकतो.

पचनसंस्थेवर परिणाम

वजन वाढण्यासोबतच रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने आपल्या पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो. यामुळे आपली पचनक्रिया बिघडू शकते. पचनसंस्था आपल्या शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित करते. तिचे कार्य बिघडले तर त्रास वाढू शकतो.

हृदयावर परिणाम

रात्री सतत मिठाई खाल्ल्याने तुमच्या हृदयावरही परिणाम होऊ शकतो. जास्त साखरयुक्त पेय प्यायल्याने, गोड पदार्थ खाल्याने वजन वाढते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदयावर परिणाम झाल्यास ते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक ठरते.

झोपेवरही होतो परिणाम

तज्ज्ञांच्या मते, रात्री गोड खाल्ल्याने शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते. यामुळे मेंदू सक्रिय होतो, ज्यामुळे तुमचे रात्रीचे झोपेचे चक्र विस्कळीत होऊ शकते. झोपेची कमतरता असणे हे देखील अनेक आजारांचे कारण आहे.

साखरेच्या पातळीवर होतो परिणाम

रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी विस्कळीत होऊ शकते. कधी साखरेची पातळी वाढते तर कधी झपाट्याने घसरते. त्यामुळे चिंता, मूड बदलणे, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जे आपल्या शरीरासाठी अतिशय घातक ठरते.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.