तुम्ही देखील चिकन खात असाल तर सावधान! अहवालात धक्कादायक माहिती आली पुढे

चिकन खायला अनेकांना आवडते. बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक जण चिकन संबधित वेगवेगळ्या डिश आवडीने मागवतात. पण तुम्हाला माहितीये का की चिकन खाने आपल्यासाठी किती घाटत ठरु शकते. याचे परिणाम नंतर तुम्हाला दिसू शकतील. त्यामुळे आताच सावध व्हा.

तुम्ही देखील चिकन खात असाल तर सावधान! अहवालात धक्कादायक माहिती आली पुढे
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 10:23 PM

तुम्ही विकत घेऊन जे चिकन खात आहात ते आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे हे तुम्हाला माहित आहे का. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CAE) च्या प्रयोगशाळेतील संशोधनात असेही आढळून आले आहे की चिकनमध्ये 40 टक्के प्रतिजैविकांचे अवशेष असतात. चिकनमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. असे मानले जातात. परंतु अलीकडील काही संशोधनात असेही समोर आले आहे की जे लोक हे सेवन करतात त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि त्यांच्यावर अँटीबायोटिक्सचा प्रभाव खूपच कमी होऊ शकतो.

चिकन खाताय तर सावधान

कोंबड्यांना वेगवेगळ्या रोगांपासून वाचवण्यासाठी किंवा त्यांना लवकर मोठे करण्यासाठी तसेच त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्यांना अँटीबायोटिक दिले जाते. त्यामुळे जर तुम्ही ते चिकन खालले तर तुमच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. कारण चिकनमधील अँटिबायोटिक्स तुमच्या शरीरात जातात. त्यानंतर त्याची आपल्या शरीराला सवय होते. पण जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते, तेव्हा त्याच्यावर अँटीबायोटिक्स लवकर काम करत नाहीत, त्यासाठी मग त्यांना जास्त डोस दिले जातात. जे शरीरासाठी हानिकारक असू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल काय

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात देखील असा दावाही करण्यात आला आहे की, जगभरात कोविड-19 महामारीच्या काळात देखील अँटिबायोटिक्सच्या अंदाधुंद वापर करण्यात आला. पण अनेकांवर तर आता अँटीबायोटीकचाच परिणामच होताना दिसत नाहीये. डब्ल्यूएचओच्या अहवालात देखील असे आढळून आले की सुमारे 75 टक्के रुग्णांवर अँटीबायोटिक्सने उपचार केले जातात. पण जेव्हा ते काम करत नाही तेव्हा त्याची अधिक डोस द्यावा लागतो. पण एक वेळ अशी येते की शरीर देखील त्याला प्रतिसाद देणे बंद करुन टाकतात.

COVID-19 महामारीच्या काळात अँटिबायोटिकचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. पूर्व भूमध्य आणि आफ्रिकन प्रदेशात तो 83 टक्क्यांनी वाढला तर पश्चिम पॅसिफिक प्रदेशात तो 33 टक्क्यांनी वाढला. गंभीर COVID-19 झालेल्या लोकांना अँटिबायोटिक वापराचे सर्वाधिक डोस देण्यात आले.

जेव्हा एखाद्या रुग्णाला अँटिबायोटिकची गरज असते, तेव्हा त्याचे दुष्परिणाम देखील तितकेच असतात. जेव्हा अनावश्यक पण त्याचा वापर होतो तेव्हा ते धोके निर्माण करतात.  जानेवारी 2020 ते मार्च 2023 दरम्यान 65 देशांमधील रूग्णालयात दाखल झालेल्या 4,50,000 रूग्णांच्या डेटावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
महाविकास आघाडीच्या प्रेमातून नव्हे तर... राज ठाकरे यांनी दाखवला आरसा
महाविकास आघाडीच्या प्रेमातून नव्हे तर... राज ठाकरे यांनी दाखवला आरसा.
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?.
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय.
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण...
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण....
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस..
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस...
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल.
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन.
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात.
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे.
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल.