Health | कोबीच्या सूपमध्ये असतात भरपूर पोषक तत्वं, 4 किलोपर्यंत वजन होऊ शकते कमी !

Health | कोबीचे सूप प्यायल्याने केवळ तुमचे वजन कमी होणार नाही. तर त्यामधील पोषक तत्वांमुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतील. फक्त तुम्हाला कोबीचे सेवन योग्य पद्धतीने करावे लागेल.

Health | कोबीच्या सूपमध्ये असतात भरपूर पोषक तत्वं, 4 किलोपर्यंत वजन होऊ शकते कमी !
4 किलो वजन कमी करा
Image Credit source: सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Sep 09, 2022 | 10:19 AM

Health | आजकाल अनेक जण वाढत्या वजनामुळे (Weight Gain) त्रस्त असतात. अनियमित दिनचर्या, कामाचा वाढता ताण, खाण्या-पिण्याच्य चुकीच्या सवयी, नीट झोप न होणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल बऱ्याच जणांना लठ्ठपणाला (Obesity) सामोरे जावे लागते. तुम्हीही वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल तर घाबरू नका. एका आठवड्यात घरी राहून तुम्ही 4 किलोपर्यंत वजन कसे कमी करू शकाल, हे जाणून घ्या..

पराठा नव्हे सूप प्या

ऐकायला जरी हे विचित्र वाटत असेल तरी हे शक्य होऊ शकते. कोबीचे सूप (Cabbage Soup) प्यायल्याने तुमचे वजन लागलीच (Weight Loss) कमी होऊ शकते. यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. जर तुम्ही बऱ्याच काळापासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर कोबीचे सूप हे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकेल.

भरपूर पोषक तत्व

कोबीच्या सूपमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वं असतात. कोबीमध्ये लोह, फॉस्फरस, झिंक (जस्त), सोडिअम, कोलिन, नियासि, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, फोलेट यासह कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, थायमिन आणि मॅगंनीज यासारखी अनेक पोषक तत्वे असतात. ही पोषक तत्वे ॲंटी-ऑक्सीडेंट्सनी भरपूर असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असते.

वजन कमी करण्यात सहाय्यक

वजन कमी करण्यासाठी कोबीचा वापर सूप पिण्याद्वारे केल्यास, खूप फायदेशीर ठरते. त्याच्या सेवनाने पोट लवकर भरते. कोबीचे सूप प्यायल्याने वारंवार भूक लागत नाही. जलदरित्या वजन कमी करायचे असेल तर डाएटमध्ये कोबीचे सूप समाविष्ट करावे.

सूप बनवा झटपट

हे सूप बनवण्यासाठी दोन मोठे कांदे, दोन हिरव्या मिरच्या, दोन टोमॅटो, एक कोबी , तीन गाजर आणि व 6 ते 8 कप पाणी घ्यावे. सर्व भाज्या स्वच्छ धुवन चिरून घ्याव्यात. एका कढईत एक छोटा चमचा तेल घालून ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालावा. तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतावा. त्यानंतर कढईमध्ये बारीक किसलेला कोबी, बाकीच्या बारीक चिरलेल्या भाज्या, मिरची व थोडे मीठ घालावे.

कोबीचे सूप तयार

या मिश्रणात पाणी घालून कढईवर झाकण ठेवावे. मंद आचेवर हे 10 मिनिटांपर्यंत शिजू द्यावे. त्यानंतर हे सूप गाळून त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून या सूपचा आस्वाद घ्यावा.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )