कोरोनामुळे पुन्हा वाढणार तणाव! नवीन XE प्रकार ओमिक्रॉन BA.2 पेक्षा अधिक संसर्गजन्य

कोरोनाबाबत एक चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. XE हा ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 चा ‘रिकॉम्बिनंट स्ट्रेन’ आहे. WHO ने आपल्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. जोपर्यंत या नवीन व्हेरिएंटमध्ये प्रसार आणि रोगात लक्षणात बदल दिसून येत नाही तोपर्यंत तो ओमिक्रॉनच्या प्रकाराशी संबंधित असल्याचे अहवालात नमूद आहे.

कोरोनामुळे पुन्हा वाढणार तणाव! नवीन XE प्रकार ओमिक्रॉन BA.2 पेक्षा अधिक संसर्गजन्य
कोरोनामुळे पुन्हा वाढणार तणाव! Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 9:26 AM

कोरोना (Corona) विषाणूचा नवीन व्हेरिएंट XE हा ओमिक्रॉनच्या BA.2 पेक्षा सुमारे 10 टक्के जास्त संसर्गजन्य असू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबत चिंता व्यक्त केली आहे. XE हा ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 चा ‘रिकॉम्बिनंट स्ट्रेन’ (Recombinant strain) आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने आपल्या अहवालात म्हटले आहे, की जोपर्यंत त्याच्या प्रसाराची क्षमता आणि लक्षणांमध्ये बदल दिसून येत नाहीत तोपर्यंत तो ओमिक्रॉनचा प्रकार मानले जाईल. अहवालानुसार, त्याचा वाढीचा दर BA.2 च्या तुलनेत 10 टक्के जास्त आहे. दरम्यान, याची पूर्ण खात्री करण्यासाठी अधिक माहितीची आवश्यकता असल्याचेही अहवालात नमूद आहे.

‘डब्ल्यूएचओ’ नुसार BA.2 सबव्हेरियंट ही आता जगातील सर्वात मोठी चिंता आहे. ज्यांच्या अनुक्रमित प्रकरणांची संख्या सुमारे 86 टक्के आहे. यूकेमध्ये 19 जानेवारी रोजी प्रथम XE स्ट्रेन आढळून आला आणि तेव्हापासून 600 हून अधिक XE प्रकरणांची खात्री झालेली आहे. ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या मुख्य वैद्यकीय सल्लागार सुझान हॉपकिन्स म्हणतात, की आतापर्यंत त्याची संसर्गजन्यता, कोविड-19 लसींची तीव्रता किंवा परिणामकारकता याबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी पुरेशी माहिती नाहीत. ‘डब्ल्यूएचओ’ने अहवालात म्हटले आहे, की ते XE सारख्या ‘रिकॉम्बिनंट’ प्रकारांच्या धोक्यांवर लक्ष ठेवत राहतील आणि संबंधित माहितीही गोळा करत राहतील.

अद्याप ठोस पुरावे नाहीत :

XE व्यतिरिक्त, डब्ल्यूएचओ आणखी एक ‘रिकॉम्बिनंट’ प्रकार, XD वर देखील लक्ष केंद्रीत केले आहे, जो डेल्टा आणि ओमिक्रॉनचा एक ‘हायब्रिड’ आहे. त्याची बहुतेक प्रकरणे फ्रान्स, डेन्मार्क आणि बेल्जियममध्ये आढळली आहेत. ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे, की आतापर्यंत समोर आलेले नवीन पुरावे XD अधिक सांसर्गिक किंवा अत्यंत घातक परिणाम असल्याचे ठोस सांगू शकत नाही. त्यामुळे तूर्तास याबद्दल काळजी करण्याची गरज नसून कोरोनासंबंधित नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.

Sri Lanka Ban Social Media: श्रीलंकेत संचारबंदीनंतर आता सोशल मीडियावरही बॅन, फेसबूक, ट्विटर आणि WhatsApp आऊट ऑफ सर्व्हिस

Petrol Diesel Price : 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव

IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपवरील आंद्रे ‘राज’ 24 तासांंत गेलं, ईशानने हिसकावली ऑरेंज कॅप, बटलर दुसऱ्या स्थानी

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.