‘टाइप 2च्या मधुमेहानं त्रस्त आहात? गोड खाण्यापूर्वी ‘ही’ एक गोष्ट प्या; रक्तातली साखरेची पातळी राहील नियंत्रित, जाणून घ्या, काय आहे संशोधन!

| Updated on: Jun 17, 2022 | 4:53 PM

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी एक मार्ग सापडला आहे. संशोधकांनी असे निरीक्षण केले की ज्या लोकांनी जेवणापूर्वी हाय प्रोटीनचे सेवन केले त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी खाल्ल्यानंतर वाढली नाही.

‘टाइप 2च्या मधुमेहानं त्रस्त आहात? गोड खाण्यापूर्वी ‘ही’ एक गोष्ट प्या; रक्तातली साखरेची पातळी राहील नियंत्रित, जाणून घ्या, काय आहे संशोधन!
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

जेव्हा मधुमेहाची समस्या असते तेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar levels) खूप वेगाने वाढू लागते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखणे आवश्यक आहे. अलीकडेच, शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला, ज्यामध्ये असे आढळून आले, की टाइप 2 मधुमेह (Type 2 diabetes) असलेल्या रुग्णांनी जेवणाच्या 10 मिनिटे आधी हेवी प्रोटीनचे सेवन केले तर अन्न खाल्ल्यानंतर वाढणारी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. शास्त्रज्ञांना असेही आढळून आले की जेवणापूर्वी हाय प्रोटीन असलेले पेय (High protein drinks) प्यायल्याने हायपोग्लाइसेमियाचा धोका न वाढता दररोज रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. या अभ्यासात टाइप 2 मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त 18 लोकांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व लोकांना आठवडाभर जेवण करण्यापूर्वी हेवी प्रोटीनचा डोस देण्यात आला. अभ्यासादरम्यान, सर्व लोकांचा अनुभव आला की जेवणापूर्वी हाय प्रोटीन पेय प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

मधुमेहांच्या रुग्णांना दिलासा

ओहायोमधील क्लीव्हलँड क्लिनिकच्या डायना आयझॅक्स यांनी मेडिकल न्यूज टुडेला सांगितले, की जर लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी सात दिवस हाय प्रोटीनचे सेवन करून नियंत्रित राखली गेली, तर त्यामुळे मधुमेहामुळे शरीराचे अवयव डोळे, मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेची गुंतागुंत कमी होऊ शकते. तसेच मधुमेहांच्या रुग्णांचा इतर समस्यांचा धोकाही कमी करण्यात मदत करू शकते. दरम्यान, हाय प्रोटीन शेक प्यायल्याने, नक्की काय फायदे होऊ शकतात याबाबत पुष्टी करण्यासाठी आणखी अनेक चाचण्या आवश्यक असल्याचे डायना आयझॅक्स यांनी सांगीतले.

टाइप 2 मधुमेह म्हणजे काय

मधुमेहाचे दोन प्रकार आहेत – प्रकार 1 आणि प्रकार 2. टाइप 2 मधुमेह तेव्हा होतो जेव्हा स्वादुपिंड खूप कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करतो. इन्सुलिन हा एक संप्रेरक आहे जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करतो. तर टाइप 1 मधुमेहामध्ये स्वादुपिंड इन्सुलिन अजिबात तयार करत नाही. टाइप 2 मधुमेहामध्ये, इन्सुलिनच्या कमी उत्पादनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढलेली राहते. त्यामुळे व्यक्तीच्या नसा, डोळे, हृदय आणि किडनीला इजा होण्याचा धोका असतो. डॉ. इसाक याबाबत म्हणाले की, टाइप 2 मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. मात्र, यासाठी तुम्हाला खूप मेहनत आणि महागडी औषधांची गरज आहे. ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी केवळ तोंडावाटे औषधे घेणे पुरेसे नसल्याचे त्यांनी सांगीतले.

हे सुद्धा वाचा

गोड खाण्यापूर्वी प्या प्रोटीन शेक

लॉस एंजेलिसच्या सेडार्स-सिनाई येथील मधुमेह गुणवत्तेचे वैद्यकीय संचालक एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. रोमा वाय ग्यानचंदानी यांनी मेडिकल न्यूज टुडेला सांगितले की, वास्तविक जीवनात सूक्ष्म पोषक घटक वेगळे खाणे खूप कठीण आहे. अशावेळी तुम्ही ते खाण्यापूर्वी प्रोटीनयुक्त पेय प्यायले तर ते खाल्ल्यानंतर वाढणारी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. डॉ. रोमा यांनी सांगितले, की जर तुम्ही प्रथम फॅट आणि नंतर कार्बोहायड्रेट्सचे सेवन केले तर ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी कायम राहते.

जिवनशैलीत बदल आवश्यक

डॉ.ज्ञानचंदानी म्हणाले की, मधुमेहाच्या रुग्णांच्या उपचारात औषधे वाढवण्याऐवजी जीवनशैलीत बदल करायला हवा, हे दाखवण्याचा प्रयत्न अभ्यासात करण्यात आला आहे. ते म्हणाले, की आजच्या काळात औषधे खूप महाग झाली आहेत, या औषधांसोबतच दुष्परिणामही होतात. अशा परिस्थितीत जिवनशैलीत बदल करूनही तुम्हाला औषधांसारखेच फायदे मिळू शकतात. जसे की उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मीठाचे सेवन कमी करावे. मधुमेह कमी करण्यासाठी रोज जास्तीत जास्त पायी चालावे याबाबत आजतक ने सविस्तर वृत्त प्रसारीत केले आहे.