AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugar level : सकाळी साखरेची पातळी किती असावी? जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी

Sugar level in Morning : सकाळी काही वेळा शरीरातील साखरेची पातळी वाढलेली असते. वास्तविक, हार्मोन्समधील बदल हे यामागे सर्वात मोठे कारण मानले जाते. रात्री झोपताना ‘हार्मोन्स’ नियंत्रित करण्यासाठी शरीरात जास्त प्रमाणात ‘इन्सुलिन’ तयार होते. त्यामुळे सकाळी साखरेची पातळी वाढते.

Sugar level : सकाळी साखरेची पातळी किती असावी? जाणून घ्या 'या' महत्त्वपूर्ण गोष्टी
रक्तातील साखरेचं प्रमाण (प्रातिनिधिक छायाचित्र)
| Updated on: Mar 07, 2022 | 12:41 PM
Share

Sugar level in Morning : रक्तातील साखरेचे प्रमाण (Sugar level) नियंत्रित करणे मोठे आव्हान असते. साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेह (Diabetes) सोबतच उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी विविध समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे बहुतेक लोक रक्तातील साखरेच्या पातळीबाबत जागरूक असतात. दरम्यान, रिकाम्या पोटी साखर का वाढते याबद्दल अनेक लोकांमध्ये मतभेद आहेत. त्यामागे प्रत्येकाचे वेगवेगळे तर्क असतात. वास्तविक, अनेकांची साखरेची पातळी सकाळी (Morning) वाढलेली असते. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी साखर का वाढते, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच साखरेची सामान्य पातळी किती असावी? असाही प्रश्‍न निर्माण होत असतोच. मधुमेहाचा मूत्रपिंड, हृदय, डोळे, त्वचा आणि मेंदूवरही परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहींनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

सकाळी साखरेची पातळी किती असावी?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकाळी रिकाम्या पोटी साखरेची पातळी सामान्य करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण साखरेची पातळी वाढल्याने व्यक्तीला अनेक प्रकारे त्रास होऊ शकतो, तसेच अनेक गंभीर आजारदेखील होऊ शकतात. असे मानले जाते, की सकाळी रिकाम्या पोटी सामान्य रक्तातील साखरेची पातळी 70-100 mg/dl असावी. जर साखरेची पातळी 100-125mg/dl झाली तर ते धोकादायक ठरते. रक्तातील साखरेची पातळी 126mg/dlपेक्षा जास्त मधुमेहाच्या श्रेणीत येते. या परिस्थितीत, आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा समस्या वाढू शकते.

साखर कशी नियंत्रित करावी?

1) रात्री वेळेवर जेवण्याचा प्रयत्न करा, तसेच नेहमी सकस आहार घ्यावा. 2) जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका किंवा बसून कामे करू नका, शतपावली करावी. 3) रात्री स्नॅक्स, कर्बोदके घेणे टाळा. त्यामुळे सकाळी रक्तातील साखर वाढण्याची शक्यता अधिक असते. 4) शरीराला सतत ‘हायड्रेट’ ठेवा. जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. 5) सकाळी नेहमी नाश्ता करावा. नाश्त्यात फक्त आरोग्यदायी गोष्टीच खाव्यात.

आणखी वाचा :

Health Care Tips | काय आहे चिया बियाणे, कसा कराल चिया बियाणांचा आहारात सामावेश, जाणून घ्या चिया बियाणांविषयी

Mumbai Fish : मुंबईकरांना कॅन्सरचा धोका? बोबिंल, घोळ, माशात मायक्रोप्लॅस्टिकचे अंश

Sattu for health: उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी सत्तूचा आहारात समावेश करा, या समस्या नक्कीच दूर होतील!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...