हिवाळ्यात आजारांपासून दूर रहायचे असेल तर ‘या’ सुपरफूड्सचा आहारात करा समाावेश

| Updated on: Nov 14, 2022 | 9:36 AM

हिवाळ्याच्या दिवसात आपली तब्येत खराब होण्याचा धोका सर्वाधिक असतो. पण आहार योग्य असेल तर चिंता करण्याची गरज नाही.

हिवाळ्यात आजारांपासून दूर रहायचे असेल तर या सुपरफूड्सचा आहारात करा समाावेश
Image Credit source: Freepik
Follow us on

थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. हवामानात होणाऱ्या बदलांसोबतच आपल्या आहारातही बदल होत असतात. हिवाळ्यात (winter days) अशा काही पदार्थाचा आहारात (diet) समावेश केला जातो, जे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊब मिळते. मात्र हिवाळ्यात आपले आरोग्य बिघडण्याचाही धोका असतो. एखादी छोटीशी चूकही झाली तर सर्दी, खोकला, ताप यासारखे अनेक आजार होऊ शकतात. पण जर आपला आहार चांगला व योग्य असेल तर या आजारांना घाबरण्याची काही गरज नाही. हिवाळ्याच्या दिवसांत पोषक तत्व (nutrition in food) असलेला आहार घेण्याची शिफारस केली जाते.

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिवाळ्याच्या दिवसात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

हिरव्या पालेभाज्या 

हे सुद्धा वाचा

हिवाळ्याच्या दिवसात हिरव्या भाज्या विशेषत: पालेभाज्यांचे उत्पादन भरपूर होते. अशा वेळी आहारात पालक, मेथी, मोहरी, पुदिना आणि विशेषतः हिरव्या लसूण यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराची उष्णता लगेच वाढते, जी थंडीच्या दिवसांसाठी अतिशय योग्य आहे. हिवाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या या लोकप्रिय भाज्या आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

देशी तूप

घरी कढवलेले किंवा बाहेरून आणलेले शुद्ध देशी तूप आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. अन्न तुपात शिजवावे किंवा भात, वरण, पोळीवर तूप लावून त्याचे सेवन करावे. तूप हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगल्या फॅट्सचा एक अमूल्य स्रोत आहे. हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची पातळी सुधारण्यासाठी तूप हा एक सोपा मार्ग आहे.

गाजर खावे
हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या या निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. गाजर हेही त्यापैकीच एक आहे. एका संशोधनानुसार, ज्या लोकांनी तीन आठवड्यांसाठी दररोज सुमारे एक कप गाजर खाल्ले, त्यांच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी आढळून आली.

आहारात काजूचा समावेश करा
काजूमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक (जस्त) अशी अनेक खनिजे असतात. हिवाळ्याच्या दिवसांत शेंगदाणे, बदाम, काजू, पिस्ता आणि खजूर यांचे सेवन करणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)