
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत आपण स्वतःकडे कमी लक्ष देतो. अनेक लोकांना तर कमी वेळेत शक्य तितके जास्त काम करायचे असते. त्यामुळे आपण आपल्या आहाराकडेही योग्य लक्ष देत नाही. वेळ वाचवण्यासाठी अनेक वेळा आपण जेवण पटकन घाई मध्ये करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की घाईत कधीही जेवण करू नये. जर तुम्ही देखील घाई मध्ये जेवण करत असाल तर हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
खरंतर जेवण कधीही घाई मध्ये करू नये याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तुम्ही पटकन जेवण करून तुमचा वेळ वाचवत आहात असे तुम्हाला वाटत असेल तर असे केल्याने तुम्ही स्वतः आजारपण मागवून घेत आहात. डॉ. किरण गुप्ता यांच्याकडून जाणून घेऊ की घाई मध्ये जेवण न करण्याचे काय कारण आहे.
डॉ. किरण गुप्ता यांनी सांगितले आहे की घाई मध्ये जेवण केल्याने रक्तातील साखरेवर परिणाम होतो. खरं पाहायला गेले तर जेव्हा आपण जेवण पटकन खातो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.
घाई घाई मध्ये जेवण केल्याने पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. कारण घाई मध्ये जेवण केल्यास शरीर योग्यरीत्या अन्न पचवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जळजळ, गॅस, पोटदुखी आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय घाईत जेवण केल्याने हवा गिळण्याची समस्या देखील होऊ शकते. ज्यामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात आणि आतड्यांचे आरोग्य बिघडू शकते.
घाई मध्ये जेवण केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. घाई मध्ये जेवल्याने जळजळ होऊ शकते तसेच आतड्यातील बॅक्टेरियाची असंतुलन असू शकते. ज्यामुळे ह्रदयरोगाशी संबंधित समस्या वाढू शकतात. याशिवाय घाई मध्ये जेवण केल्यास रक्तदाबही वाढू शकतो त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.