Eggs Safety : अंडी खाणाऱ्यांनो सावधान! अंड्यात सापडले नायट्रोफ्युरान्स ? FSSAI ने दिले तपासण्याचे आदेश

अंड्यांच्या शिवाय अनेकांचा सकाळचा नाश्ता पूर्ण होत नाही.परंतू अंड्यांमुळे तुम्ही आजारी पडू शकता. चला तर अंड्याच्या संदर्भात सुरु असलेल्या वादंगाबद्दल माहिती घेऊयात...

Eggs Safety : अंडी खाणाऱ्यांनो सावधान! अंड्यात सापडले नायट्रोफ्युरान्स ?  FSSAI ने दिले तपासण्याचे आदेश
Banned Antibiotics In Eggs
| Updated on: Dec 16, 2025 | 9:07 PM

अंड्यांना आजवर पौष्टीक म्हटले जात आहे. रोज अंडी खाण्याचा सल्लाही दिला जात असतो. प्रोटीनसाठी अंडी खाण्याचा प्रघात आहे. परंतू आता अंड्यावरच संक्रात आली आहे. अंड्यांच्या गुणवत्तेवर सवाल केला जात असल्याने आता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रँडेड आणि विना ब्रँडेड अंड्यांचे सँपल जमा करावेत आणि त्यांची तपासणी करण्यासाठी 10 मान्यता प्राप्त लॅबोरेटरीत पाठवण्याचे आदेश सोमवारी FSSAI ने देशभरातील आपल्या क्षेत्रीय कार्यालयाना दिला आहे. या सँपलमध्ये नायट्रोफ्युरान्सची तपासणी करण्यात येणार आहे.

ही कारवाई एग्ज ब्रँड एगोजच्या अंड्याच्या क्वालिटी संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांनंतर केली गेली आहे. या अंड्यात नायट्रोफ्युरान्सचे अंश असू शकतात. नायट्रोफ्युरान्स हा एंटीबायोटीक्सचा समुह आहे.ज्याचा वापर फूड -प्रोड्यूसिंग जनावरात करण्यावर बंदी आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते जर पोल्ट्री फॉर्मिंग मध्ये या औषधांचा अवैध रुपाने याचा वापर करत असेल तर त्याचे अंश अंड्यात सापडू शकतात. या संशयाने देशभरातील सॅपलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंड्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

एका ऑनलाईन रिपोर्टमध्ये अंड्याच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर हा मुद्दा सोशल मीडियावर सार्वजनिक चर्चेचा झाला. त्यामुळे नियामक एजन्सी सर्तक झाल्या आहेत. एगोजने या संदर्भात आपली उत्पादने सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. कंपनी एक्सवर माहिती देताना सांगितले की,’ जसे आम्ही वचन दिले होते. त्यानुसार २५ तारखेचे आमचे ताजे लॅब रिपोर्ट्स आता उपलब्ध आहेत. आणि सर्वांना संदर्भासाठी सार्वजनिकरित्या ते उपलब्ध आहेत. आमच्या ग्राहकांची सुरक्षा आणि विश्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे. आम्ही आमच्या फार्म आणि उत्पादनात उच्चतम मानकांचे पालन यापुढेही सुरुच ठेवणार आहोत.’

एक्सपर्टचे काय म्हणणे ?

मेडिकल एक्सपर्टच्या मते पोल्ट्री सेक्टरमध्ये एंटीबायोटिक्सचा दुरुपयोगाची समस्या आता एका गंभीर सार्वजनिक आरोग्य चिंतेचे कारण बनली आहे. डॉ. जैनिथ लोववंशी यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यात त्यांनी सांगितले की जर तुम्ही रिस्क घेऊ इच्छित नसाल तर देशी अंडी ट्राय करु शकता.

अनेक तज्ज्ञांच्या मते नायट्रोफ्यूरान्सला जगभरात बंदी घातली आहे. कारण याचे अवशेष शिजवल्यानंतरही अंड्यात कायम राहातात. दीर्घकाळ अशी दुषित अंडी सेवनाने पशूंवर केलेल्या संशोधनात जेनेटीक डॅमेज आणि कॅन्सरचा धोका वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. याशिवाय याने लिव्हर आणि किडनीला देखील नुकसान पोहचू शकते.