महागडे प्रोडक्टही होतील फेल, मसुर डाळीचा फेसपॅक वापरा, चेहरा ग्लो करेल

प्रत्येक स्वयंपाकघरात डाळ्यांचे अनेक प्रकार सहज उपलब्ध असतात. त्या सर्वांच्या आवडत्या आहेत. तुम्हाला माहित आहे का की या डाळी तुमच्या त्वचेसाठीही वरदान आहेत? मृत त्वचा काढून टाकून, त्या त्वचेचा रंग सुधारतात. चला तर मग, त्वचेच्या काळजीसाठी त्यांचा वापर कसा करायचा ते पाहूया.

महागडे प्रोडक्टही होतील फेल, मसुर डाळीचा फेसपॅक वापरा, चेहरा ग्लो करेल
face pack
| Edited By: | Updated on: May 19, 2026 | 11:27 PM

उन्हाळ्याच्या दिवसात धुळ, प्रदुषण आणि वाढत्या उष्णतेमुळे तुमच्या त्वचेची चमक कमी झाली असेल आणि तुम्ही ती परत मिळवण्यासाठी स्वस्त आणि सुरक्षित उपाय शोधत असाल, तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या या डाळीच्या पीठापासून फेसपॅक बनवू शकता. तर या डाळीच्या सेवनासोबतच त्यापासून तयार फेसपॅक निरोगी त्वचा राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ही डाळ जवळजवळ सर्व प्रकारच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. चला तर मग स्किन केअरसाठी या डाळीचा वापर कसा करायचा आणि त्वचेला लावल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

स्वयंपाकघरात असलेली मसुरची डाळ आणि त्यापासून बनवलेलं फेसपॅक हे नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करतात. या फेसपॅकच्या मदतीने त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतात आणि त्वचेला खोलवर स्वच्छ करतात. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होईल. चला तर मग आजच्या लेखात आपण या फेसपॅकचा वापर कशासाठी करता येईल ते जाणून घेऊयात.

त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी

टॅनिंगमुळे जर तुमचा चेहरा निस्तेज झाला असेल आणि त्वचेचा रंग फिका पडला असेल, तर डाळीचे पीठ, 1 चमचा दही, चिमूटभर हळद, मध आणि टोमॅटोचा रस एकत्र करून एक पेस्ट तयार करा. ती तुमच्या चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटांनंतर थोडे गुलाबपाणी किंवा दुधाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर चेहरा धुवून टाका. यामुळे तुमच्या त्वचेला ओलावा मिळेल, टॅनिंग निघून जाईल आणि त्याचबरोबर मृत त्वचादेखील निघून जाईल. उत्तम परिणामांसाठी तुम्ही हा पॅक आठवड्यातून दोनदा लावू शकता.

बेसिक फेस पॅक

तुम्हाला जर बाजारात मिळणारे स्क्रब वापरायचे नसतील, तर आठवड्यातून एकदा मसूरने तुमची त्वचा एक्सफोलिएट करा. मसूर रात्रभर पाण्यात भिजवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर त्यात कच्चे दूध मिक्स करा आणि ते तुमच्या चेहऱ्यावर, हातांवर आणि पायांवर लावा. ते सुमारे 8 ते 10 मिनिटे तसेच राहू द्या, त्यानंतर हातांवर दूध घेऊन गोलाकार हालचालींमध्ये त्वचेवर व्यवस्थित मसाज करा. तुम्हाला पहिल्याच वेळी तुमच्या त्वचेत फरक जाणवेल. यामुळे त्वचा अधिक मुलायम देखील होते.

काळ्या डागांसाठी उत्तम

तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर मसूर डाळ वाटून घ्या आणि त्यात काकडीचा रस, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि दही टाकून सर्व ‍मिश्रणांची पेस्ट बनवा. त्यात थोडे गुलाबपाणी टाकून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. तुमची त्वचा कोरडी असल्यास मध किंवा क्रीम लावायला विसरू नका. हा फेस पॅक काळे डाग कमी करतो आणि तुमच्या चेहऱ्याची कांती सुधारतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

डाळी स्क्रबप्रमाणे काम करतात, त्यामुळे त्या दररोज लावू नका. हा फेस पॅक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावणे पुरेसे आहे. जर तुमची त्वचा जास्त काळवंडली असेल, तर तुम्ही तीनदा लावू शकता. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर कोणताही फेस पॅक लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us